सहाय्यक प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा; रिक्त पदांपैकी ४० टक्के सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी वित्त विभागाची मान्यता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वित्त विभागाने रिक्त पदांपैकी ४० टक्के सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) भरतीसाठी मान्यता दिली आहे.
पद भरतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाहीही सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
२०८८ सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथील केले असून ही भरतीही लवकरच केली जाईल. यामध्ये सेट, नेट, पीएचडी, एम फील झालेल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक पदांना मान्यता घेऊन पुढील महिन्यात ही पदभरती केली जाणार आहे. महादेव जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. सहायक प्राध्यापकांच्या ३५८० पदांना उच्चस्तरीय समितीने स्थगिती उठवून मंजुरी दिलेली आहे. यातील १९४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. शिवाय २१९ पदांच्या भरतीस शासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.