महाराष्ट्र
प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद चोरडीया व चेतनशेठ चोरडीया आदर्श शेतकरी सन्मान
By Admin
प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद चोरडीया व चेतनशेठ चोरडीया आदर्श शेतकरी सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद नारायणदास चोरडीया व चेतनशेठ चोरडीया यांनी पाथर्डी पासुन दोन ते आडीच कि.मी. अंतरावर पाथर्डी हद्दीमध्ये १३ एकर पडीक माळरानामध्ये लोकडाऊनच्या काळामध्ये फळबाग फुलवली व पडीक जमीनीमध्ये आदर्शवत फार्म हाऊस निर्माण केले.पडीक जमीनीत उत्कृष्ठ रित्या जाबांच्या झाडाची, अब्यांची, सिताफळाची व जांभळीच्या झाडाची लागवड करून नंदनवन फुलवल्यामुळे राष्ट्रीय शेतकरी युनीयन अहमदनगरच्या वतीने चोरडीया फार्म हाऊसला शिवारफेरीनिमीत्त भेट देऊन सुरेशचंद चोरडीया व चेतनशेठ चोरडीयाशी सवांद साधला.
यावेळी चेतनशेठ यांच्याशी सवांद साधला आसता चेतनशेठ म्हणाले की मागील दिड वर्षापुर्वी लॉकडाऊन होते त्यामुळे माझा उद्योगधंदा बंद होता घरात बसण्याऐवजी आपली १३ एकर पडीक जमीनीमध्ये फळबाग लावण्याच्या संकल्पना माझ्या मनात आली व त्या दृष्टीने जमीन डेव्हलप करुन पाण्याची सोय सर्वप्रथम केली. त्यानंतर ८ एकर क्षेत्रामध्ये जांभ , अंबा, सिताफळ, जांभळी या झाडांची लागवड केली व उर्वरीत पाच एकर मध्ये टरबुज व खरबुज पिकांची सुधारित पद्धतीने लागवड केली. जांभ हे एका वर्षात विक्रीस येणारे पिक घेतले व जांभ गुजरातच्या मार्केटला पाठवले . तसेच छंद म्हणुन शेती करत असताना शेतीमध्ये फळबागेमुळे मला दोन एकर मध्ये ५ लाखाचे जाबांचे पिक वर्षात निघाले. यासाठी मी मोबाईलद्वारे अधुनिक शेती कशी करावी याची माहीती घेतली व माहीती व तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केल्यामुळे मला शेती परवडू लागली व शेतीमध्ये आनंद मिळू लागल्यामुळे त्यांचेच रुपांत्तर एका सुंदर फार्महाऊस मध्ये झाल्याचे समाधान वाटते. सुसक्षित तरूणांनी अधूनिक माहीती व तंत्रज्ञानाच्या आधार शेती करावी व फळबाग लागवड करावी निश्चीतच शेती धंदा परवडेल तसेच कमी कालावधीमध्ये येणारे टरबुज, खरबुज व इतर पिके घ्यावेत असा सल्ला सुसक्षित तरूण शेतकऱ्यांना चेतन यांनी दिला.
यावेळी अहमदनगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष शेतकरीनेते बाळासाहेब ढाकणे यांनी राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या वतीने पडीक माळरानावर सुरेशचंद चोरडीया व चेतनशेठ चोरडीया यांनी नंदनवन फुलवल्याबद्दल आदर्श शेतकरी म्हणुन पिता पुत्रांचा सम्मान केला व त्यांच्या शेतीविषयक आवडीचे कौतुक केले व परीसरातील शेतकऱ्यांनी चोरडीया पिता पुत्राचा आदर्श घेऊन सुधारीक व अधुनिक पद्धतीने शेती करावी व चोरडीया फार्महाऊसला भेट देऊन चोरडीया पितापुत्रांचे शेती विषयक मार्गदर्शन घ्यावे आसे अवाहन शेतकरी बांधवास केले.यावेळी शिवार फेरीमध्ये राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे पाथर्डी तालुकाध्यक्ष हारी वायकर व शेतकरी उपस्थित होते.
Tags :
402602
10