पाथर्डी एसटी कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी पोपट सानप यांची निवड, सचिवपदी अलीमभाई पठाण
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी आगाराची कार्यकारिणी १४ जानेवारी रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी अहमदनगर विभागीय सचिव श्री.नितीनजी येणे, विभागीय अध्यक्ष श्री.गणेजी फाटक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.शिवनाथजी आंधळे, श्री नुरम्हमद पटेल , श्री नितीनजी गाली यांच्या उपस्थितीत पार पडली.
पाथर्डी आगारातील सर्वांचे लाडके नेत्तृत्व श्री.अलिमभाई पठाण यांची पाथर्डी आगार सचिवपदी व अध्यक्षपदी श्री. पोपट सानप यांची निवड करण्यात आली. तसेच पाथर्डी कार्याध्यक्ष पदी शिवनेसेचा वाघ निष्ठावंत कार्यकर्ते श्री.संतोषजी आंधळे व जेष्ठ नेते खजिनदार पदी सर्वांचे लाडके श्री.नारायणजी कंठाळे, श्री महादेव गर्जे , श्री सोमनाथ खेडकर उपाध्यक्ष, श्री किरण दहिफळे , श्री आदिनाथ बडे सहसचिव यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पाथर्डी तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हा संघटक श्री रामदासभाई गोल्हार, पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री विष्णूपंत पवार, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार डाळिंबकर युवासेना प्रमुख व शिवव्याख्याते श्री सचिन नागपुरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, श्री नवनाथ वाघ, नवनाथ,उगलमुगले आसाराम ससे, बबनराव शेळके,मंगेश राठोड, संतोष मेळघुंडे, दलित शिवसेनेचे नेते आंबादास आरोळे यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.