महाराष्ट्र
महाराष्ट्राचा विकास अहमदनगर जिल्ह्यापासून : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे
By Admin
महाराष्ट्राचा विकास अहमदनगर जिल्ह्यापासून : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे
उपोषणाला बसले ते ठेकेदार : ना. विखे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षम (आत्मनिर्भर) भारताचे स्वप्न बघीतले आहे. त्यासाठी राज्यातील भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना सरकार सज्ज झाले असून, मी राज्याचा महसुलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी स्वत: स्विकारत आहे.
महाराष्ट्राचा विकास अहमदनगर जिल्ह्यापासून होईल, असा विश्वास राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांबरोबर येथील भगतसिंग चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी भुषविले. यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, नितीन दिनकर, प्रकाश चित्ते, शहराध्यक्ष मारुती बिंगले, सभापती नाना शिंदे, नगरसेवक दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, केतन खोरे, रवी पाटील, शशिकांत कडुस्कर, विठ्ठल राऊत, दत्ता जाधव, रुपेश हरकल, अनिल भनगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी स्वागत केले. प्रास्तविक भाषणात आयोजक रवी पाटील यांनी शहरात ना. विखे पाटील यांनी विकासाची गंगा वाहती केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच विविध प्रलंबीत प्रश्न सोडविणेबाबत आवाहन केले. ना. विखे पाटील म्हणाले, गुजरातच्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाला 53 टक्के मतदान मिळण्याची एकमेव घटना घडली आहे. यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून घेतलेले निर्णय आहे. सामाजिक योजनांचा हा विजय आहे. मोदींच्या कार्याची जगाच्या पातळीवर दखल घेण्यात आली आहे. विश्व नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व पुढे आले असून, 'जी-20' परिषदेचे यजमानपद भारताकडे आले, हे भाजपाचे यश आहे.
कोव्हीडच्या काळात केंद्र सरकार जनतेबरोबर राहिले. गरीबांना मोफत धान्य दिले. 200 कोटीच्यावर जनतेने कोरोना डोस व बुस्टर डोस घेतले. जगाला जमले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दुसर्या बाजुला राज्यातील आघाडी सरकार माझे कुटुंब तुझी जबाबदारी, असे म्हणत केंद्राकडे बोट दाखवत बसले. त्यामुळे महाराष्ट्र आघाडी सरकारच्या संकटातून मुक्त झाला असून, राज्यात जनतेचे सरकार आले आहे.
उपोषणाला बसले ते ठेकेदार : ना. विखे
जिल्ह्यात ठेकेदारी वाळू माफियामुळे गुन्हेगारी वाढली होती. आम्ही सर्व माफियांचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे उपोषणाला बसले ते ठेकेदार असून, यापुढे ऑनलाईन अर्ज करताच वाळू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचणार असून, पाच हजार रुपये ब्रासची वाळू पाचशे रुपयाने नागरीकांना पोहच होणार असल्याची घोषणा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी करताच उपस्थितांनी एकाच जल्लोष केला.
जिल्ह्यात औद्योगिकरण व पर्यटन वाढविणार : ना.विखे
जिल्ह्यातून जेवढे विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले. त्यांची एक बैठक घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे उद्योगासाठी जागा, निधी उपलब्ध करुन जिल्ह्यात रोजगार निर्मिती करणार आहे. तसेच श्रीरामपूर एमआयडीसी प्रमाणे इतर ठिकाणी उद्योगांना संधी देणार. आय.टी.हब तयार करणार, जिल्ह्यात आद्योगिकरण व पर्यटन वाढविणार असल्याचे ना. विखे यांनी सांगितले.
श्रीरामपूरसाठी काहीपण..!
श्रीरामपूर शहरासाठी 5 कोटीचा निधी दिला आहे. आणखी साडेसात कोटी मंजुर करतो. श्रीरामपुरला काय पाहिजे ते सांगा, मी निधीची उपलब्धता करुन देतो. 'श्रीरामपुरसाठी काहीपण' अशी घोषणा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करताच भारतीय जनता पार्टीचा जयघोष झाला.
Tags :
70264
10