महाराष्ट्र
9047
10
कवडदरा काॕलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
By Admin
कवडदरा काॕलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमधील
इयत्ता बारावीतील कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम (दि.02) गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे दडपण न ठेवता परीक्षा द्यावी.तसेच विषयाचा अभ्यास करताना मन एकाग्र करत अभ्यास करावा.
परीक्षेला जाताना वेळेवर परीक्षा केंद्रावर जावे.तसेच पेपरच्या मनामाध्ये कोणतीही भिती ठेवू नये.परीक्षा केंद्रावरील नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.प्रश्न प्रञिकेतील प्रश्न काळजीपूर्वक विचार करुन सोडवावेत.
विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेसंबधी मार्गदर्शन
माहीती प्राचार्य व्ही.एम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
माझ्या शैक्षणिक सेवा सुरूवात या विद्यालयापासून सुरू झाली असून शेवटही याच ठिकाणी झाला.विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना विद्यार्थी हित लक्षात घेवून त्याच्या समस्या जाणून घेवून शिक्षण दिले.
शिस्तबद्ध काॕलेज प्रत्येक विषय व्यवस्थितपणे समजावून सांगणाऱ्या शिक्षकांनी विविध विषयाचे मार्गदर्शन तसेच सराव प्रश्न आपणास दिलेले असून यावर आधारित प्रश्न प्रञिका असणार आहे.
विषयाच्या संकल्पना,प्रायोगिक अभ्यासक्रम,सज्ञा आपणास समजावून सांगितल्या आहेत.मनावर शांती मिळवून अभ्यास करावा असे माजी क्रिडा शिक्षक व्ही.टी.होन यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आलेले अनुभव तसेच शिक्षकाविषयी मनोगत व्यक्त केले.तसेच वर्षेभरातील आठवणी सांगितल्या.
तसेच विद्यालयाला निरोप देताना विद्यार्थी भारावून गेले.यावेळी काॕलेजमधील इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परीक्षेला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी भरवीर खुर्द- कवडदरा गृप ग्रामपंचायत सरपंच सौ.अश्विनी भोईर तसेच इतर सदस्य व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अकरावी कला व विज्ञान विद्यार्थी उपस्थित होते.
Tags :

