महाराष्ट्र
आंतरजातीय लग्नामुळं बहिणाच्या नवऱ्याची १४ वर्षानंतर कुऱ्हाडीने हत्या;
By Admin
आंतरजातीय लग्नामुळं बहिणाच्या नवऱ्याची १४ वर्षानंतर कुऱ्हाडीने हत्या; रस्त्यावरच घडली रक्तरंजित कहाणी, अंगावर शहारे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सख्या बहिणीने शेजारच्या तरुणासोबत पळून जाऊन आंतरजातीय लग्न १४ वर्षापूर्वी केले होते. त्याचा मनात राग धरून लहान भावाने १४ वर्षांनंतर मेहुण्यावर कुऱ्हाडीने सपासप ६ वार करत निर्घृणपणे खून केला.
अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर रस्त्यावर अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता. या घटनेमुळं परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला आहे. सख्या बहिणीने शेजारच्या तरुणासोबत पळून जाऊन आंतरजातीय लग्न १४ वर्षापूर्वी केले होते. त्याचा मनात राग धरून लहान भावाने १४ वर्षांनंतर मेहुण्यावर कुऱ्हाडीने सपासप ६ वार करत निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळं खळबळ माजली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे सचिन व बाबासाहेब दोघेही शेजारी राहत होते. १४ वर्षापूर्वी बाबासाहेबने सचिनच्या बहिणीला पळवून नेत तिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. यावेळी सचिन अवघ्या १० वर्षांचा होता. या घटनेमुळं समाजात सचिनच्या कुटुंबियाना वेगळी वागणूक मिळत असे. तसेच आंतरधर्मीय विवाह आणि बहिणीनेही केलेल्या विवाहामुळे गावात लोकांकडून आई-वडिलांचा अपमानास्पद वागणूक मिळत होती. याचा राग सचिनच्या मनात कायम होता, त्यामुळे सचिनने लहानपणीच मेहुण्याचा काटा काढायचा निर्णय घेतला होता. आणि १४ वर्षानंतर बहिणाच्या नवऱ्याचा काटा काढला.
ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.४० वाजता इसारवाडी फाट्यावर घडली. सचिन शामराव नाटकर (२४, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर दुचाकीवरून फरार झालेल्या सचिनला पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दोन तासांत ताब्यात घेतले. तर मृताचे बाबासाहेब खिल्लारे (३४) असे नाव आहे. भावोजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून मेहुण्याने रक्ताने माखलेली हातातील कुऱ्हाड वर करून महामार्गावरच नाचत करत आसुरी आनंद व्यक्त केला. या घटनेमुळं रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याने औरंगाबादहून नगरच्या दिशेने जाणारी वाहने पुढे न जाऊ शकल्याने ७ किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
Tags :
610716
10