महाराष्ट्र
1925
10
दडपशाही व सुडाच्या राजकारणाला राज्य वैतागले आहे. अजितदादा पवार
By Admin
दडपशाही व सुडाच्या राजकारणाला राज्य वैतागले आहे. अजितदादा पवार
पाथर्डी- शेवगाव मतदार संघातील महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेचा समारोप
पाथर्डी प्रतिनिधी:
तुमच्या चुका दाखवल्या की तुम्हाला राग येतो.दडपशाही व सुडाच्या राजकारणाला राज्य वैतागले आहे.सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन येत नाही.आगामी काळात राज्यकर्त्यांची सत्तेची मस्ती व नशा उतरवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र काम करावे.आघाडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी भांड्याला भांडे वाजून न देता एक व्हा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
भगवानगड व ४६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शेतकरी मेळावा व पाथडी-शेवगाव मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अँड.प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेचा समारोप कार्यक्रम बाजार तळावरील विराट सभेने झाला.यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, उपनेत्या सुषमा अंधारे,आमदार निलेश लंके,माजी आमदार राहुल जगताप,चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग,घनश्याम शेलार,राजेंद्र फाळके,संदीप वर्पे,प्रभावती ढाकणे,योगिता राजळे,ऋषिकेश ढाकणे,बंडू बोरुडे, शिवशंकर राजळे,भगवान दराडे आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले,सरकारच्या काळात पाथर्डी व शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर केला.भगवानगड व ४६ गावांच्या पाणी योजनेला २६ मार्च २०२२ ला तांत्रिक तर २७ एप्रिल २०२२ ला प्रशासकीय मान्यता देऊन १९० कोटींची तरतूद केली.काही लोकांकडून याबाबत दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.शिवसेनेचे चिन्ह व पक्ष तुम्ही काढून घेतला.याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनात तीव्र संताप आहे.कांद्याच्या भावा बाबत शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे.कांदा विकून दोन रुपयांचा चेक देण्याकडे आपण सभागृहाचे लक्ष वेधले तर सोलापूरच्या संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना आमच्यावरील रागातून निलंबित केला.मोडक्या जुन्या एसटी बस वरील जाहिरातीकडे लक्ष वेधले तर अधिकाऱ्यांना निलंबित करून पगार रोखले.अशा पद्धतीने कारभार फार काळ चालत नाही.सभागृहात चुकीची उत्तरे,लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी कुरापती काढत वाद विवाद करत राहायचे.अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे बळीराजा उध्वस्त झाला.मात्र सरकारला देणे घेणे नाही.फक्त सरकार कसे टिकेल या विवांचनेत सरकारला जबाबदारीचा विसर पडला आहे.पुण्यातील कसब्याची पोटनिवडणूक जिंकून आमची ताकद दाखवून दिली.मात्र तो निकाल खूपच झोंबला.या निकालाने कार्यकर्त्यांनी हुरळून जाता कामा नये.पुढील निवडणुकांसाठी संघटित रहा.मुदत संपून
वर्षाहून अधिक काळ उलटून सुद्धा जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,महानगरपालिकांच्या निवडणुका जाणीवपूर्वक घेतल्या जात नाहीत.सत्तेची शाश्वती नसल्याने त्यांना आताच निवडणुका नको आहेत.पाथर्डी पालिकेच्या तक्रारीबाबत दिलेल्या सर्व निवेदनांची दखल घेऊ. नदीपात्रात गटारीचे बांधकामाचा विषय मनमानीपणाचा असून याची चौकशी करू.लोकप्रतिनिधींनी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे.
यावेळी बोलतांना अंधारे म्हणाल्या,उद्धव ठाकरे व अजित पवार जेथे जातील तेथे सभांना मोठी गर्दी जमते.विविध रंगाचे राजकारण करण्यात भाजप मशगुल आहे.भाजपने स्वार्थासाठी अनेकांना वापरून घेतले.राजू शेट्टी पासून सदाशिव खोत बाजूला केले.तोच कित्ता जाणकारांच्या बाबतीत घडून आता राणा दाम्पत्याला वापरून बच्चू कडूंना बाजूला करण्याचे उद्योग सुरू आहेत.२०१४ साली पंकजा मुंडे यांना राज्यभर फिरवले.त्या पंकजा आज कुठे आहेत.विनोद तावडे जरी फडणवीस यांच्या तावडीतून सुटले तरी बावनकुळे यांचे अवघड दुखणे आहे.चंद्रकांत पाटलांचा गेम कुणी केला.ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना संपवून कारभार करता येणार नाही.आमदार मोनिका राजळे यांच्या दो टप्पे राजकारणावर आपण कोणती भूमिका घेणार ? ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना त्रास दिला त्यांच्या सत्तेत राहणार का ? मुंडे साहेबांच्या भाषणाची टिपणे काढणारे देवेंद्र फडणवीस हेच आता वंजारी समाजाला लगाम घालायला निघाले आहेत.भावनिक राजकारण करू नका, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक ॲड. प्रताप ढाकणे तर आभार तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी झालेली विक्रमी गर्दी पाहून सर्वच प्रमुख नेत्यांनी धोरणात्मक भाषणे केली.
Tags :

