कोरडगाव ग्रामपंचायतीकडून कचरा गाडीचे लोकार्पण
अवलिया बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोरदार जय्यत तयारी
पाथर्डी- प्रतिनिधी
स्वच्छता भारत मिशन अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा गाडीचे लोकार्पण सरपंच भोरूशेठ म्हस्के व उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कचरा गाडीमुळे गाव स्वच्छ राहणार असून प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.
तसेच कोरडगाव येथे अवलिया बाबाच्या यात्रेला २९ मार्च रोजी प्रारंभ होणार असून त्या पार्श्वभूमीवर कोरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जोरदार जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने गावातील विजेच्या खांबावरील गेलेल्या बल्बाची पाहणी करण्यात आली आणि ज्या ठिकाणचे विजेचे बल्ब गेले आहेत, त्या ठिकाणी नवीन बल्ब टाकण्याच्या सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरुशेठ म्हस्के, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रतापनाना देशमुख, त्रिंबकदादा देशमुख, नागनाथ वाळके, शंकरमामा ससाणे, विनायक देशमुख गुरुजी, राहुल मस्के, अश्फाक शेख, आकाश मस्के, दादासाहेब राऊत, अर्जुन मुखेकर, आशीर्वाद कचरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल शिंदे, अंबादास जाधव, बाबुराव रोकडे, भाऊ घोरपडे, गणेश मस्के, गणेश कचरे, शिवाजीराव बोंद्रे, मुरलीधर काकडे, नवनाथ कसबे, आसाराममामा बोंद्रे, कृष्णनाथ देशमुख, पिंटूभाऊ काकडे, ज्ञानेश्वरमाऊली देशमुख, अर्जुन देशमुख, संजय कसबे यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.