पाथर्डी- पालकमंञ्यांसाठी राष्ट्रवादीचे भाजपला आवाहान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आजारी पडल्यामुळे ते
पाथर्डी शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचेच भांडवल करीत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. आजारीपणाचे देखील भाजपकडून राजकारण होत असल्याने पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणीही रोखू शकत नाही. त्यांना रोखून दाखवावे, असे प्रति आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख यांनी दिले आहे.
शेख म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेली हानी न भरून येणारी असली तरी, शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून निश्चित मदत केली जाणार आहे. पंचनामे पूर्ण होताच प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. पाथर्डी शेवगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. पालकमंत्री आजारी पडल्यामुळे ते जिल्ह्यात येऊ शकले नाहीत, त्याचेच विरोधकांकडून भांडवल केले जात असून ही खेदाची बाब आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणी रोखू शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केल्यास तो राष्ट्रवादी विकास आघाडीचे कार्यकर्ते हाणून पाडतील, असे राजू शेख यांनी म्हटले आहे.