महाराष्ट्र
स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा आरक्षणासाठी 'लेटर टू सीएम' आंदोलन छेडणार- डॉ.कृषिराज टकले
By Admin
स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा आरक्षणासाठी 'लेटर टू सीएम' आंदोलन छेडणार- डॉ.कृषिराज टकले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्राने 50 टक्के ची मर्यादा घातल्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी बिकट झाला आहे मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा एकत्र आला होता त्यामुळे सरकारला त्या वेळेस निर्णय घ्यावा लागला होता मराठा आरक्षण मिळवायचा असेल तर विस्थापित मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे त्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात म्हणून मराठा समाजातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाने मराठा समाजासाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी सरकारला पत्र लिहून मराठा समाजाच्या भावना कळाव्यात यासाठी 'लेटर टू सीएम' हे आंदोलन स्वाभिमानी मराठा महासंघाने हातात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजातील कुटुंब प्रमुख यांनी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवावे असे आव्हान स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी केले आहे.
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्हा सह संघटक पदी डॉ.सुनील उगले यांची नुकतीच निवड करण्यात आली निवडीचे पत्र अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी दिले.
डॉ.सुनील उगले यांच्या निवडी प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे निरीक्षक व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश तांबे, मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे ,अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड ,कार्याध्यक्ष किशोर लोढे, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर ,तालुका कार्याध्यक्ष शरद थोटे ,नारायण लबडे ,अतुल लबडे आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पुढे म्हणाले की ,मराठा आरक्षणावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी स्मरण पत्र पाठवण्यात येणार आहे यामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजातील ज्येष्ठ तरुण मंडळींनी सहभागी व्हावे कारण मराठा नेतेच मराठा आरक्षणावर गप्प आहेत मात्र इतर आरक्षण रद्द झाल्यावर मराठा नेतेच मोर्चे काढतात मराठा आरक्षणासाठी का आंदोलन होत नाहीत.असे डाॕ. कृषिराज टकले यांनी यावेळी सांगितले.
Tags :
57237
10