महाराष्ट्र
जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून देशाचे भवितव्य उज्ज्वल करावे प्रा. चंद्रकांत पोतांगले
By Admin
जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून देशाचे भवितव्य उज्ज्वल करावे प्रा. चंद्रकांत पोतांगले
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री आनंद महाविद्यालयात नुकताच 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने व सी.व्ही. रमण यांना अभिवादन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषराव पवार उपस्थित होते.
यानिमित्ताने न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, शेवगाव येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. चंद्रकांत पोतांगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपले व देशाचे भवितव्य उज्ज्वल करायला हवे, असे त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.
तसेच महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. मुक्तार शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना संबोधले की, चिकित्सक वृत्ती ठेवून आपण आपले उच्च ध्येय गाठू शकतो. तसेच त्यांनी हे ही नमूद केले की, श्रद्धा असावी पण त्यात देखील वैज्ञानिक दृष्टी ठेवणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी विज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्याना आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा महाविद्यालयीन जीवनात तसेच करिअर साठी उपयोग करणे गरजेचे आहे असेही नमुद केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पायल शर्मा, कु. उदमले निकिता, कु. प्रिया ढाकणे, आणि कु. सुप्रिया गीते यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने प्रोजेक्ट स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, सेमिनार स्पर्धा व फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुदर्शन बडे, द्वितीय सोनाली ढवळे, तृतीय क्रमांक निकिता उदमले व नाजिया शेख यांना विभागून देण्यात आले. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम शितल चव्हाण, द्वितीय साक्षी बुरकुले, तृतीय प्रतिक्षा दाते व पल्लवी भडके यांना विभागून देण्यात आले. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -सिद्धार्थ कंगे, द्वितीय- गौरव गर्जे, तृतीय क्रमांक आफताब शेख यास मिळाला तर सेमिनार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -सुप्रिया गीते, द्वितीय - वैष्णवी गायकवाड व पल्लवी भडके यांना विभागून व तृतीय क्रमांक ऐश्वर्या दराडे व प्रिया ढाकणे यांना विभागून देण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विज्ञानदिनाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. अजिंक्य भोर्डे यांना भारत सरकारचे पेटंट मिळाले म्हणून गौरविण्यात आले. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक वैद्य यांना पी.एचडी पदवी प्राप्त झाली, त्याबद्दल गौरविण्यात आले तर प्राध्यापिका सौ. मनीषा सानप अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार, प्रोफेसर डॉ. मुक्तार शेख, प्रोफेसर डॉ. जगन्नाथ बरशिले, प्रा. डॉ. संजय नरवडे, प्रा. डॉ. धीरज भावसार आणि डॉ. जयश्री खेडकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पी.एचडी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनाही गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाचे सर्व सभासद, प्रा. सूर्यकांत काळोखे, प्राध्यापिका अनिता पावसे, प्रा. अजिंक्य भोर्डे आणि प्रा. डॉ. जयश्री खेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. दिनकर जायभाये, प्रा. एकनाथ बोरुडे, प्रा. मनीषा सानप, प्रा. अरुण बोरुडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजिंक्य भोर्डे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयश्री खेडकर यांनी केले, तर आभार महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अनिल गंभीरे यांनी मानले.
Tags :
5055
10