आमदार रोहीत पवारांचा वाढदिवसानिम्मित पोषण आहार तुला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत : त्रिमूर्ती उद्योग समूह आणि राजेंद्र (काका) गुंड मित्र मंडळ यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांची पोषण आहार तुला करण्यात आली. तसेच कुपोषित बालकांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक पालकत्व अभियान राबविण्यात आले. त्याच प्रमाणे रक्तदान शिबिरही घेण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की जामखेड मधील जनता भाग्यवान आहे. त्यांना आमदार रोहित पवार यांच्या सारखे नेतृत्व लाभले, मला देखील कर्जत-जामखेड चे मतदार होण्यास आनंद होईल. तसेच आमदार रोहित पवार म्हणाले की, पोषण आहार तुला आणि त्याचे वाटप ही माझ्या जन्मदिनी अमूल्य भेट आहे . कोरोनात रक्ताचा तुटवडा भासला. मात्र रक्तदान शिबिरामुळे तो निश्चितच कमी होईल. त्यामुळे मी सर्वांना विनंती केली आहे की हार-तुरे सत्कार समारंभ याचे कुणीही आयोजन न करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर यासह सामाजिक उपक्रम सर्वांनी राबवावेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंजिरे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, जिल्हापरिषद सदस्य गुलाब तनपुरे, संतोष वारे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, राष्ट्रवादी युवकचे नितीन धांडे, श्याम कानगुडे, राष्ट्रवादी विद्यार्थी चे स्वप्निल तनपुरे, जिजा बापू शिंदे, हर्ष शेवाळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी, महेंद्र (आप्पा) गुंड, निलेश तनपुरे, दीपक यादव, प्राचार्य सूर्यभान सुद्रिक उपस्थित होते.