ॲड. प्रतिक खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप
जगदंब प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शहराचे लाडके नेतृत्व ॲड. प्रतिक खेडकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने व जगदंब प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाथर्डी शहरात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने पाथर्डी शहरात दरवर्षी प्रमाणे सामजिक सलोखा जपत येत्या काही दिवसात उन्हाळा चालू होत असून पाथर्डी शहरात रस्त्यावर बसून विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना उन्हाचे चटके बसू नये, म्हणून समाजिक भान जपत यंदा हा उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आला असून, यातून सुमारे १०० गरजू , होतकरू व प्रामाणिक व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी छत्री वाटप करतांना प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. आकाश वारे,अजय विघ्ने,पवन दहिफळे, बालु शेठ लबडे , रमेश केरकळ,वैभव गाढे, पंकज शिरसाठ,सचिन जायभाये,भैय्या शेठ बोरुडे,संदीप शिरसाट,मोनल जोजारे,देवेंद्र खाटेर,प्रेम काकडे, आशिष ढाळे, यशोधन खेडकर,नवनाथ ढाकणे, माजी नगरसेवक तुकाराम पवार, वंचितचे तालुकाध्यक्ष रविंद्र (भोरू) म्हस्के आदी सहकारी उपस्थित होते.