राजेंद्र चव्हाण यांना पत्रकारिता परीक्षेत घवघवीत यश
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील पत्रकार राजेंद्र चव्हाण यांनी नुकत्याच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या वतीने घेण्यात आलेल्या एम. सी. जे. या पत्रकारिता परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे तर्फे घेण्यात आलेल्या एम. सी. जे. या पत्रकारिता परीक्षेत राजेंद्र चव्हाण हे प्रथम श्रेणी सह विशेष योग्यतेने (टक्के- ८८.५०) उत्तीर्ण झाले आहेत.
चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांची अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा होऊन ऑगस्ट २०२१ मध्ये अंतिम लेखी परीक्षा झाली. त्यानंतर नुकत्याच या परीक्षेचा निकाल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या वेबसाईट वर घोषित करण्यात आला. अहमदनगर कॉलेज अहमदनगर या अभ्यासकेंद्रातून एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. केंद्राचा निकाल १००% टक्के लागला आहे.
राजेंद्र चव्हाण यांना या एम. सी. जे. पत्रकारितेच्या कोर्ससाठी प्रा. वैभव मोरे, प्रा. गोकुळदास गायकवाड व प्रा. अजित साळवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खरा सामनाचे संपादक दशरथ आडसूळ, पत्रकार अमोलराजे म्हस्के, दै. युवा ध्येय चे संपादक लहानु सदगीर, दैनिक जलभूमी चे निवासी संपादक शंकरराव मरकड, संघर्षनामा चे संपादक मेजर भीमराव उल्हारे, भिमराव सुपेकर, गोरख मोरे यांनी अभिनंदन केले.
राजेंद्र चव्हाण हे माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.