पाथर्डी- कोल्हार घाटातील रस्त्याची दुरावस्था,वाहनचालकाची कसरत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोल्हार घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेऊर येथून शिराळा चिचोंडीकडे जाताना लागणारा कोल्हार घाट वर्दळीचा रस्ता आहे. तसेच औरंगाबाद महामार्गावरून पाथर्डीकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून रस्त्यावरच माती, मुरमाचे ढिग पडलेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकी चालक पडून अपघात घडत आहेत. घाट उतारताना व चढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.