पाथर्डी प्रतिनिधी
तहसील कार्यालय पाथर्डी येथे आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जाती जमाती (VJ , NT) कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नती बाबत होणाऱ्या अन्याया विरोधात आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनात भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अशोकराव चोरमले, आघाडीचे प्रमुख नवनाथ नरोटे,सभापती गोकुळ दौंड,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पालवे,अजय रक्ताटे,बंडू बोरूडे,अॅड.प्रतिक खेडकर,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार,शहराध्यक्ष अजय भंडारी,अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष युसफ शेख,वैद्यकीय आघाडीचे डॉ.सुहास उरणकर, अनुसुचित जाती जमाती आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान साठे,नगरसेवक बजरंग घोडके,बबन बुचकुल,रमेश हंडाळ,मंगल कोकाटे,सरचिटणीस जे.बी.वांढेकर,आदिनाथ धायतडक,उत्तम गर्जे, बाळासाहेब गोल्हार,नारायण पालवे,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,अभिजीत गुजर,करोडीचे सरपंच आश्रु खेडकर,महेश अंगारखे,भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रशीद तांबोळी,भुतेटाकळीचे सरपंच सचिन फुंदे,उपसरपंच कल्याण फुंदे,राम्हारी खेडकर,बप्पासाहेब डुकरे,आजीनाथ बडे,संतोष जाधवर आदी च्या उपस्थित यावेळी तहसीलदार श्री. शाम वाडकर यांना निवेदन दिले.