अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी माेर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बैलगाडी माेर्चा काढण्यात आला. यासाठी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी आंदाेलनाचे नेतृत्व केले.
सोयाबीन, बाजरी, उडीत, मूग, भुईमूग, मका खळे झालेल असले, तरी पंचनामे व्हावेत. ऑक्टाेबरमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे व्हावेत. पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यातील पशुधनाचे पुरामुळे माेठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्तांना मदत व्हावी. तसा दाखला द्यावा. पशुधनाची हानी झालेल्याची लाभार्थ्यांना इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावे. पंचनामे होऊन मदत मिळेपर्यंत सरकारी थकबाकी, बॅंक कर्ज वसुलीस, पाणीपट्टी, ग्रापंचयत थकबाकी, शेतीपापंचे वीजबिल वसुलीला स्थगिती द्यावी. शासनाने एकरी ५० हजार रुपये मदत घ्यावी. पीकविमा १००% मंजूर करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दिवाळी पूर्वी नुकसान भरपाई न मिळाल्यास दिवाळीच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्याच्या घरी खर्डा भाकरी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला. या वेळी प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, संपर्क प्रमुख प्रतापसिंह कांचन, संघटक अशोक चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, अशोक मोरे, भाऊसाहेब वाडेकर, विजय बडाख, रवींद्र पठारे, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे, आशिष खंडेलवाल आदी सहभागी झाले हाेते.