दादापाटील राजळे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महोत्सव साजरा
पाथर्डी प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. याचे औचित्य साधून कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रफीत विद्यार्थ्याना दाखवण्यात आली. तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी आपल्या मनोगतामधून सावित्री फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
हा कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळ व सांस्कृतिक मंडाळाअंतर्गत घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी.बी. गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. एस. बी. देशमुख यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. राजकुमार घुले, डॉ. नितीन भिसे, प्रा. अनिता पाटोळे, प्रा. अस्लम शेख, रवी फलके, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.