शिक्षकाने विष अन् युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील गोंधवणी परिसरातील संजय शेळके (वय ५५)या प्राथमिक शिक्षकाने राहत्या घरात विष घेवून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी घडली. ते हरेगाव येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते.
प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विष प्राशन करून तर अवघ्या २३ वर्षाच्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
त्यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर तालुक्यातील पढेगाव परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
प्रशांत तोरणे (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. येथील कामगार रुग्णालयात उपचारासाठी त्यांना आणले होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करुन उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. तोरणे याने देखील कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. याचा शोध पोलीस घेत आहेत.