संकटात सापडलेल्या पुरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी.- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शेवगांव तालुक्यातील शेतकरी महापुराच्या संकटात सापडला आहे. गेली १० ते १२ दिवसापासुन सरकारचे नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे काम चालु आहे.
महापुराच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे उभे पिके उदवस्त झाले असून अनेकांचे संसार उपयोगी वस्तु वाहून गेल्या आहेत अनेकांचे पशुधन मृत्यूमुखी पडले तर काहींचे पशुधन वाहुन गेले अनेकांची घरात पाणी शिरल्यामुळे घरे पडली तर घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य, खते, कपडे यांचीही नुकसान झाले असल्यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाले असून एकदंरीत पाथर्डी शेवगांव भागातील पुरग्रस्त हवालदिल झाले असून सरकारच्या तातडीच्या मदतीची ते वाट पाहत आहेत. महापुरामुळे पाथर्डी शेवगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांचे जीवन उदवस्त झाले असून सरकारने सदर परीस्थितीचे गांभीर्य पाहता तातडीने मदत करण्याऐवजी पंचनामे करण्यात वेळ घालण्याऐवजी पाथर्डी शेवगांव भागातील पुरग्रस्तांना तातडीचे १लाख रुपायांची मदत जाहीर करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी पुरग्रस्तांची पाहणीच्या दौऱ्या दरम्यान शासनास केली आहे.
येत्या पंधरा दिवसात शासनाने पाथर्डी शेवगांव तालुक्यातील पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी अन्यतः राष्ट्रीय शेतकरी युनीयन अहमदनगर व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणुन तीव्र अंदोलन केले जाईल असा इशारा पाथर्डी शेवगांवच्या पुरग्रस्तांच्या वतीने ढाकणे यांनी दिला आहे.