महाराष्ट्र
प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
By Admin
प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर जयवंतराव टेमकर यांना भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक, रयत शिक्षण संस्थेचे मा.चेअरमन, शिक्षणतज्ज्ञ आदरणीय अँड रावसाहेब शिंदे साहेब यांच्या विचाराने कार्यरत विश्वलक्षमी ग्रामीण प्रतिष्ठाण, श्रीरामपुर यांनी 2024 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ, राजीव शिंदे,संस्थापक सचिव मा.सुखदेव सुकळे सर,कार्याध्यक्ष मा.प्राचार्य टी.ई.शेळके,उपाध्यक्ष मा.डॉ, बाबुराव उपाध्ये,कोषाध्यक्ष मा.सुयोग बुरगुले यांनी जाहीर केला.
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी हे प्राचार्य टेमकर यांचे जन्मगाव, त्यांचे शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा माळेवाडी व माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंदिरगाव सध्याचे भास्करराव पाटील गलांडे विद्यालय आणि उच्च शिक्षण आर.बी.एन.बी.काॅलेज, श्रीरामपूर येथे झाले.1991 पासून ते दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे प्राध्यापक व 2010 पासून प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विविध समित्यांवर कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन लेख व चार ग्रंथ प्रकाशित असून पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत.शिक्षण तज्ञ,थोर विचारवंत आदरणीय अँड रावसाहेब शिंदे ,सहकार महर्षी स्व, दादापाटील राजळे व आदरणीय आ.आप्पासाहेब राजळे यांचे विचार, प्रेरणेतून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शांत, संयमाने,विश्वासाने सर्वांना सोबत घेऊन ते काम करतात.एकंदर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्याने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी विश्वलक्षमी बंगला,बोरावकेनगर, श्रीरामपूर येथे मा.डॉ, वसंतराव जमधाडे, माजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय अ.नगर, मा.प्राचार्य टी.ई.शेळके,कार्याध्यक्ष, अँड रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान,व संस्थापक सचिव मा.सुखदेव सुकळे विश्वलक्षमी ग्रामीण विकास प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे शुभहस्ते होणार आहे.
प्राचार्य डॉ राजधर टेमकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय श्री.आप्पासाहेब राजळे पाटील, आमदार मोनिकाताई राजीव राजळे,विश्वस्त मा.राहुलदादा राजळे,मार्गदर्शक मा.जे.आर.पवार, सचिव मा.भास्करराव गोरे,मा.आर.जे.महाजन, अधिक्षक विक्रमराव राजळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी अभिनंदन केले.
Tags :
66781
10