महाराष्ट्र
13372
10
बारावीच्या पहिल्याच पेपरला आढळले ९ कॉपीबहाद्दर
By Admin
बारावीच्या पहिल्याच पेपरला आढळले ९ कॉपीबहाद्दर
बारावी इंग्रजीच्या पेपरला ११४३ विद्यार्थी गैरहजर
६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
नगर सिटीझन न्युज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील
११६ केंद्रांवर मंगळवारपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला जिल्ह्यात ९ कॉपीबहाद्दर आढळून आले. शेवगावातील परीक्षा केंद्रांवर २, तर पाथर्डीतील परीक्षा केंद्रावर ७कॉपीबहादर सापडले. दरम्यान, एकूण ६२ हजार ४६२ विद्याथ्यांपैकी इंग्रजीच्या पेपरला ११४३ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर ६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपळगाव येथील परीक्षा केंद्रावर १६ डमी विद्यार्थी आढळल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु माध्यमिक शिक्षण विभागाच्या दोन पथकांनी केंद्राला भेट देऊन तपासणी केली. या तपासणीत केंद्रात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा खुलासा या पथकाने केला.
जिल्ह्यातील ६२ हजार ४६२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला
३८ संवेदनशील केंद्रावर अधिकचा पोलिसांचा फौजफाटा
बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. ११६ परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ३८ संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्व खातेप्रमुख, तहसीलदार, बीडीओ यांचे बैठे पथक तळ ठोकून होते.
६१ हजार ३१९ विद्यार्थी हजर होते. तर ११४३ विद्यार्थी गैरहजर राहिले. कॉपीमुक्त अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण
पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिप्री येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर १६ डमी विद्यार्थी आढळल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाने
२१ परीरक्षक तैनात आहेत. एकूण ७भरारी पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या. दरम्यान, शेवगाव येथील परीक्षा केंद्रावर २ कॉपी बहाद्दर आढळले, तर पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर ७ कॉपीच्या केसेस आढळून आल्या आहेत.
दरम्यान, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी मंगळवारी राहुरी तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. बारावीची
पाथर्डीत परीक्षार्थीपेक्षा कॉपी पुरवणाऱ्यांची संख्या अधिक
मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मागील अनुभव पाहता यावेळी परीक्षेत गैरप्रकार हऊ नयेत, यासाठी प्रशासनाने परीक्षा केंद्रासह परिसरात सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच भरारी पथकांसह बैठे पथकांची देखील नियुक्ती केली आहे. मात्र इतके सर्व काटेकोर नियोजन करून देखील पहिल्याच पेपरला पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कॉपी बहाद्दर आढळून आले आहेत. पाथर्डी तालुक्यातील काही केंद्र वगळता बहुतेक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीपेक्षा पालक व कॉपी पुरविणारांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे बारावीच्या मुलांना कॉपी देण्यासाठी दहावी शिकलेल्या मुलांची गर्दी मोठी होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीमुळेच असे प्रकार होत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील 'त्या' परीक्षा केंद्रावर 'डमी विद्यार्थी' आढळले नाही, तपासणी पथकांचा अहवाल
केंद्रावर जावून तपासणी केली. यामध्ये अहिल्यानगर उपशिक्षणाधिकारी योजना, उपअभियंता पंचायत समिती पाथर्डी, केंद्रावरील बैठे पथक या पथकांनी सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट तपासले. या तपासणीत
प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरित करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विभागाचे खातेप्रमुख, तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
केंद्रावर एकही डमी विद्यार्थी आढळला नसून कोणताही गैरप्रकार घडला नाही, असा अहवाल केंद्र संचालकानी सादर केला, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक संध्या गायकवाड यांनी दिली.
संवेदनशिल ३८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीत राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता. काही अपवाद वगळता कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Tags :
13372
10




