'हा' आमदार झोपला, कोरोना सेंटरमध्येच रुग्णांची सेवा करत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 05 मे 2021
पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.माणुसकी नात्याचे दर्शन त्याच्यातून दिसत आहे.
अहमदनगर मागील वर्षी कोरोनाची निर्माण झालेली परिस्थिती पेक्षा या वर्षी ची परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे. अशाच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर तालुक्याचे आ.निलेश लंके कोरोनाना सेंटर मध्ये रुग्णांची काळजी घेत आहेत.
मागील वर्षी कोरोनाची निर्माण झालेली परीस्थिती पेक्षा या वर्षी ची परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे. अशाच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अकराशे रुग्णांची क्षमता असणारे कोविड सेंटर सुरू केले आहे.
माणसं जगली पाहिजेत या भूमिकेने ते अहोरात्र काम करत आहेत. दिवसाच्या सरते शेवटी, व रात्री एक ते दिड वाजता ऑक्सीजन कोणाला कमी आहे का? काही समस्या आहे का ? हे सर्व स्वतः लक्ष देऊन आमदार निलेश लंके पाहत आहेत. रुग्णांना धीर देण्या साठी कोविड सेंटर मध्येच जेवण करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.
रुग्णांची सेवा करत तिथेच कार्यकर्त्यां समवेत काळजीपोटी झोपणारा हा आमदार मनात घर करत आहे. आ. निलेश लंके यांच्या माणुसकीचे दर्शन सर्वांना होताना दिसत आहे. लोकांच्या साठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या या आमदाराचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे!
त्यांच्या अहोरात्र सुरू असणाऱ्या कार्याची दखल उभ्या महाराष्ट्रात घेतली जात आहे. माझ्या माणसांच्या साठी मी राबनार नाही तर कोण राबेल असे म्हणत अविरत कष्ट करणारे नेतृत्व म्हणून निलेश लंके यांना ओळखले जाते.