धक्कादायक बातमी - पहाटे चार वाजल्यापासून रांगेत तरीही लस मिळाली नाही.- संतप्त नागरीकांचा काचा फोडण्याचा प्रयत्न
By Admin
धक्कादायक बातमी - पहाटे चार वाजल्यापासून रांगेत तरीही लस मिळाली नाही.- संतप्त नागरिकांचा काचा फोडण्याचा प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार ०१ मे 2021
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहून देखील लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी दवाखान्यातील काचेच्या खिडक्यावर हात डोके आपटून काचा फोडण्याचा प्रयत्न केला.याबाबतची माहीती आरोग्य केंद्राकडून समजली.
याबाबत सविस्तर माहीती आशी की, प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसगावसह परीसरातील पंचवीस ते तीस गावातील कोरोना लस घेण्यासाठी दररोज येतात.त्यातील काही लोक लसीचा पहीला डोस घेतल्याने दुसरा डोस घेण्यासाठी येतात.नेमका कोणता डोस कधी दिला जाईल याची माहीती नागरिकांना मिळत नसल्यामुळे पहीला व दुसरा डोस घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहाटे चार वाजल्यापासून आरोग्य केंद्रात रांगेत येऊन उभा राहतात.शुक्रवारी म्हणजेच काल १४० लसीचे डोस या ठिकाणी आले होते.परंतु या ठिकाणी चारशे ते पाचशे लोक जमा झाले होते.सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जे लोक या ठिकाणी आले होते.त्यांना आरोग्य केंद्राकडून टोकण देण्यात आले होते.परंतु पहाटे चार पाच वाजता नंबर लावून पुन्हा जे घरी गेले होते,त्यांनी अकरा,बारा वाजल्यानंतर येऊन या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.तिसगाव येथील एका माजी सैनिकावर हे टोकन देण्याची जबाबदारी रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे.परंतु काही लोकांनी संबंधित व्यक्तीशी जवळीक साधून वशिलाबाजी करत तसेच पैशाचे आमिश दाखवले असा आरोप करत काही नागरिकांनी या ठिकाणी गोंधळ घातला.तर पहाटे पाच पासून रांगेत राहून देखील लस न मिळाल्याने काही संतप्त नागरिकांनी दवाखान्याच्या खिडकीवर हात,डोके आपटून आपला संताप व्यक्त केला आहे.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नागरिक पाळत नसल्याचे दिसुन येत आहे.यामुळे कोरोना विषाणूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.कारण काही लोक या ठिकाणी कोरोना चाचणी करण्यासाठी येत आहे. लस घेणारे ,कोरोना चाचणी करणारे एकत्र येत आहेत.
नक्कीच प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असून या ठिकाणी तालुका पोलीस प्रशासन यांनी गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
शुक्रवारी १४० लसीचे डोस आरोग्य केंद्रात आले होते.चारशे ते पाचशे लोक रांगेत उभे होते.सर्वाना लस देणे शक्य नव्हते.त्यामुळे काही लोकांनी दवाखान्याच्या काचेच्या खिडकीवर हात आपटून काचा फोडण्याचा प्रयत्न केला.यामुळे पोलिस बंदोबस्त मिळाला तरच प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देणे सोपे होईल.
डाॕ. होडशीळ
प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी
तिसगाव
ता- पाथर्डी