महाराष्ट्र
3273
10
दादापाटील राजळे महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
युगपुरुष राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निमित्ताने तसेच लोकनेत्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांचे वाढदिवसानिमित्त संगणक शास्त्र प्रयोगशाळा उद्घाटन , करिअर कट्टा अंतर्गत एल .ई .डी . फलकाचे अनावरण आणि जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन दादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन श्री वृद्धेश्वर सह . सा . कारखाण्याचे व्हा . चेअरमन रामकिसन पा.काकडे , ज्येष्ठ संचालक श्री उद्धवरावजी पा. वाघ , विक्रमराव राजळे , सुभाषराव ताठे पा. शेषरावजी ढाकणे , कुशीनाथ बर्डे , डॉ. गवळी , आर .जे . महाजन व अ . नगर जिल्हा बुद्धिबळ संघाचे सचिव यशवंत बापट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १३५ खेळाडूंनी सहभाग घेतला .
ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट इ. पहिली ते चौथी यामध्ये समर्थ मंगेश जोशी, अन्वित विजय गायकवाड, अनुपम संजय भालेराव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व . इ .पाचवी ते बारावी या गटात सार्थक गणेश शिंदे, अद्वैत सुनील महाजन, आयुष अय्या यांनी यश संपादन केले तर तिसरा गट इ . बारावीच्या पुढे सर्वांसाठी खुला होता . यामधे सनी नितीन गुगळे, आशिष चौधरी, आदेश देखने यांनी यश संपादन केले . प्रत्येक गरामधून उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रोखरक्कम, पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले . कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माननीय शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहूलदादा राजळे, सुभाषराव ताठे पा., बाळासाहेब गोल्हार, श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, नारायण काकडे, सुभाष भागवतसर, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, प्राचार्य अशोक काळे, अतिश भावसारसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते . स्पर्धेमध्ये पंच म्हणून यशवंत बापट, मनीष जसवानी, प्रशांत गनगेसर, संजय खडकेसर, देवेंद्र ठोकळ सर यांनी काम पाहिले . सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र इंगळे व डॉ. निर्मला काकडे यांनी केले . प्रा. रोहित अदलिंग , प्रा . आसाराम देसाई , प्रा . उमेश तिजोरे, डॉ.किशोर गायकवाड, प्रा.चंद्रकांत पानसरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Tags :

