महाराष्ट्र
113833
10
महसूलच्या मंडळाधिकारी वैशाली दळवी यांचा निरोप समारंभ
By Admin
महसूलच्या मंडळाधिकारी वैशाली दळवी यांचा निरोप समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुकातील माणिकदौंडी महसुल मंडळाच्या मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली दळवी यांना महसुल भवन माणिकदौंडीचे वतीने निरोप देण्यात आला. माणिकदौंडी येथे मंडळ अधिकारी म्हणुन गेली ५ वर्षे पूर्ण करून त्यांची नगर तालुका येथे बदली झाली.त्यांचा नुकताच माणिकदौंडी महसुल मंडळ आणि माणिकदौंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संयुक्तपणे कोरडगाव महसुल मंडळच्या मंडळ अधिकारी श्रीमती शैला पाडळकर तर मीरी मंडळच्या मंडळ अधिकारी डॉ. प्रिती मनाळ होत्या. कार्यक्रमास माणिकदौंडी महसुलला नव्याने हजर झालेले मंडळ अधिकारी रवि शेकटकर, उपसरपंच समीर पठाण, माणिकदौंडी गावचे पोलीस पाटील वसंत वाघमारे, चितळवाडीचे सरपंच संजय चितळे, बोरसेवाडीचे सरपंच श्रीराम चितळे, धनगरवाडीचे उपसरपंच किशोर राठोड, अशोक गाढे, पोपटभाई पठाण, गोर सेनेचे आर. के. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनिल पाखरे, प्रा. राहुल मोरे, सदानंद सुतार, भास्कर गर्जे, माणिकदौंडी मंडळातील पोलीस पाटील खंडागळे पाटील, रणमले पाटील, भुजबळ पाटील यांचे सह पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी राजु मेरड यांनी केले तर सुत्रसंचालन पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी केले. आभार दयानंद सुतार यांनी मानले.
प्रास्ताविकमध्ये तलाठी राजु मेरड यांनी ५ वर्ष सोबत केलेल्या कामाचा आढावा मांडला तर अनेक आठवणी सांगतांना त्यांना अश्रु अनावर झाले. प्रा. सुनिल पाखरे, प्रा. राहुल मोरे, दयानंद सुतार, आर. के. चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त करीत दळवी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माणिकदौंडीचे तलाठी राजु मेरड, जाटदेवळाच्या तलाठी श्रीमती बडे, पोलीसपाटील वसंत वाघमारे, कोतवाल लतीफ शेख शब्बीर शेख, सुधाकर शहाणे यांनी परीश्रम घेतले.
Tags :
113833
10





