महाराष्ट्र
940
10
राष्ट्रीय दृष्टया दुर्बल घटक परीक्षेत सोमठाणे नलवडे शाळेचे यश
By Admin
राष्ट्रीय दृष्टया दुर्बल घटक परीक्षेत सोमठाणे नलवडे शाळेचे यश
सलग चौथ्या वर्षीही यशाची परंपरा कायम
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील ग्रामिण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे या शाळेने घवघवीत यश मिळविले.राष्ट्रीयदृष्टया दुर्बल घटकातील केंद्र सरकार पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेसाठी २०२५ मध्ये इयत्ता आठवी साठी झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला.फेब्रुवारी २०२५ मध्ये इयत्ता आठवी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा संपन्न झाली होती.पाथर्डी तालुक्यातील एकमेव आठवीचा वर्ग असणाऱ्या शाळेने आपल्या आठवीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी 'सातत्यपूर्ण ज्यादा तास, भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव व विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे सदैव दिले जाणारे प्रोत्साहन व मार्गदर्शन' या त्रिसुत्रीच्या जोरावर सोमठाणे नलवडे शाळेच्या इयत्ता आठवीच्या पटावरील एकूण १६ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. ५६.२५% निकालासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे ही अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रेसर ठरलेली आहे.
आपल्या यशाची परंपरा राखतांना शाळेतील उत्तीर्ण नऊ विद्यार्थ्यांपैकी कुमारी लावण्या अविनाश परदेशी ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती ४८००० रुपये साठी पात्र ठरली आहे. तर कु.वैष्णवी अशोक कासोळे, कु. वैष्णवी रावसाहेब बढे, कु. माधुरी अरुण चव्हाण, कु.श्रुती बाळासाहेब बेरड या चौघींनी प्रत्येकी ८ हजार ४०० रुपयांची राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पटकावली. चार वर्षा पासून सातत्याने या शाळेचे विद्यार्थी NMMS च्या गुणवता यादीत स्थान मिळवत असून यामुळे ग्रामीण भागातील या शाळेचे नाव राज्यस्तरावर झाले आहे.
या परीक्षेत उत्तम गुणांनी पात्र ठरलेले अन्य चार विद्यार्थी असे- कु. शिफा समसू शेख, आदित्य राजू दौंडे, कु. सिमर अजिनाथ थोरात, ज्ञानेश्वर मारुती डाके या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक, श्री नामदेव धायतडक, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक भागीनाथ बडे या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दोघा शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचेअहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी
भास्कर पाटील ,माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस , शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे,गटशिक्षणाधिकारी श्रीमती कोलते, मिशन आरंभ उपक्रम चे नोडल अधिकारी तथा विस्तार अधिकारी श्री रामनाथ कराड, विस्तार अधिकारी अनिल भवार,साकेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मच्छिंद्र गोरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमोल नलवडे, गावचे सरपंच श्रीमती साखरबाई नलवडे, उपसरपंच श्री आकाशभाऊ दौंडे, गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ, सर्व पालक व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर गर्जे यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय दृष्टया दुर्बल घटकांतील म्हणजे कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती असून राष्ट्रीय दृष्टया दुर्बल घटक या परीक्षेत पात्र होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्यास पुढील चार वर्षे दरवर्षी बारा हजार या प्रमाणे एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या शाळेत वर्षभर जादा तासिका नियोजन, अतिरिक्त सराव परीक्षा, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग या मुळे हे यश प्राप्त झाले.
-----भागीनाथ बडे, मार्गदर्शक शिक्षक, सोमठाणे नलवडे.
Tags :

