महाराष्ट्र
मागील भांडणावरून युवकावर तलवारीने हल्ला
By Admin
मागील भांडणावरून युवकावर तलवारीने हल्ला
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे कारखान्यासमोर हॉटेलमध्ये जेवण करीत असताना एका युवकावर हल्ला करण्यात आला. जखमी युवकाचे नाव समजू शकले नाही. ही घटना दि. ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या वेळी घडली.
जखमी युवकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचे समजते. पोलिसांना शासकीय रुग्णालयातून माहिती
मिळाली आहे. मात्र, जखमीचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. आंबेवाडी येथील
युवकावर गावातील तिघेजण व त्याचे दुसऱ्या गावातील सहा ते सात जणांनी मिळून एका युवकावर मागील भांडणाच्या कारणावरून
आंबेवाडी येथील चव्हाण व राठोड यांच्यात मागील भांडणाच्या कारणावरून धुसफूस सुरू होती. ३१ डिसेंबर २०२४ रोजी कारखान्यासमोरील एका हॉटेलमध्ये आंबेवाडीच्या युवकांमध्ये मारहाणीचे प्रकरण घडले. तलवारीसह काठीने हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगत आहेत. आंबेवाडीच्या युवकांनी त्यांच्या मित्रांना बोलावून घेत त्यांच्या साथीने हा हल्ला केला आहे.
हातात गावठी पिस्टल घेऊन पोझ दिलेला एक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. तालुक्यातील अनेकांच्या हातात गावठी पिस्टल दिसू लागले आहेत. आंबेवाडीतसुद्धा हे लोन पसरले आहे का? याची तपासणी झाल्यास काही गंभीर गोष्टी समोर येऊ शकतात, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
हल्ला केला. तलवार व काठीने मारहाण केल्याचे समजते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांशी संपर्क
साधला असता, जखमीचा जबाब घेतलेला नाही. आम्हाला घटनेची माहिती शासकीय रुग्णालयाकडून मिळाली आहे. जबाब घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांकडून समजते.
Tags :
10325
10