पाथर्डी तालुक्यात ग्रामसेवक संघटनेने शासनाच्या निर्णयाचे केले जल्लोषात स्वागत
पाथर्डी- प्रतिनिधी
दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ग्रामसेवक संवर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे एकत्र करून एकच पद् ग्रामपंचायत अधिकारी निर्माण झाल्याने आज पाथर्डी येथे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून तालुका संघटनेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार साहेब ग्रामविकास मंत्री श्री गिरीशजी महाजन साहेब यांचे व शासनाचे आभार मानले
यावेळी पाथर्डी पंचायत समितीच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस सन्माननीय गटविकास अधिकारी श्री शिवाजीराव कांबळे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार घालून ग्रामसेवक बंधू भगिनी यांनी अतिशय दणदणीत घोषणा देऊन फटाक्याच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सहाय्यक गट विकास अधिकारी गहिरे साहेब ,कृषी अधिकारी पालवे साहेब ,विस्तार अधिकारी कांडेकर साहेब, राजळे साहेब ,सरपंच अविनाश पालवे ,उपसरपंच रवींद्र आरोळे ग्रामसेवक संघटनेचे प्रमोद म्हस्के ,दिलीप नागरगोजे ,बडे महारुद्र, भगवान खेडकर, रोहिदास आघाव ,मुरलीधर शिरसाट ,मच्छिंद्र सांगळे ,सचिन नजन ,भवर अमोल शंकर पातकळ, नंदकिशोर तिडके, दहिफळे अशोक, अशोक फुंदे, पिटेकर भाऊसाहेब ,आव्हाड सुबोध ,सुनील वाघ ,गोपीचंद रोंढे, कटके मॅडम ,बांगर मॅडम आदी ग्रामसेवक पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते