घुले बंधू सरसावले, शेवगाव-पाथर्डीत कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने कोविड सेंटर सुरू करणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 एप्रिल
कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारच्या लोकनेते मारूतरावजी घुले पाटील मंगल कार्यालयात होणार केंद्र
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधित नागरिकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या प्रयत्नांतून शेवगाव येथे १०० बेडस् चे सर्व सोयीयुक्त सुसज्ज "कोविड केअर सेंटर" लवकरच रुग्णांच्या सेवेकरीता सुरू करण्यात येत आहे.
शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारच्या लोकनेते मारूतरावजी घुले पाटील मंगल कार्यालयात हे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्या ची प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील यांनी सोमवार रोजी प्रत्यक्षस्थळी जाऊन तेथील सोयी-सुविधांच्या तयारीचा आढावा घेतला. तालुक्यातील बोधेगाव नंतर शेवगाव शहरात हे कोविड सेंटर होत असून वेळप्रसंगी यात बेडची संख्या वाढवली जाईल असे समजते.