कवडदरा येथे एसएमबीटी रुग्णालय यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर दि.१४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.जागतिक मधुमेह दिनानिम्मित मधुमेह निदान व उपचार यावेळी शिबीरात सहभागी नागरिकांना देऊन आरोग्य विषयक माहिती व विविध आजारासंबधी माहीती देण्यात आली.तसेच यावेळी मोफत दंतआरोग्य तपासणी व उपचार शिबीरात करण्यात आले.यावेळी कवडदरा परीसरातील अनेक नागरिकांनी सहभागी होवून आपल्या आरोग्याची तपासणी करत शुगर व बीपी चेक करुन डाॕक्टरांचा योग्य सल्ला घेतला.
यासाठी विशेष सहकार्य व्यवस्थापकीय विश्वस्त,एसएमबीटी सेवाभावी संस्था डाॕ.हर्षल तांबे, डाॕ.प्रा.कविता मातेरे,डाॕ.सुनिल ढिकले,कुणाल जेजुरकर,विक्रांत कुलथे,डाॕ.निहारीका गायकवाड,डाॕ.सुकन्या गायकवाड,डाॕ.अतुल गोपनारायण,डाॕ.रोशन पाटील,डाॕ.संदेश शिंदे,डाॕ.महेश अहिरे,निखील तुमभारे,डाॕ.वैष्णवी पुंडलिक यांनी यावेळी आलेल्या नागरिकांची शारीरिक तपासणी करत आरोग्य विषयक सल्ला दिला.