स्व.आ.राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय चित्रकला
By Admin
स्व.आ.राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय चित्रकला व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न
पाथर्डी तालुका-
स्व. आ. राजीवजी राजळे यांच्या ५६ व्या जयंती निमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात तालुका स्तरीय चित्रकला व पोस्टर स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी , ८ वी ते १० वी व ११ वी ते महाविद्यालयीन स्तरावरील (मुले / मुली) अशा तीन गटात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १०६ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन मा. डॉ. विनायकराव हाडके, मा. श्री. राहुलदादा राजळे, विश्वस्त, श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्था, व माननीय श्री रामकिसन काकडे उपाध्यक्ष, श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्था यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मा. श्री. बाबासाहेब किलबिले, मा. श्री. श्रीकांत मिसाळ, मा. श्री. वसंतराव पवार, मा. श्री. बाजीराव कटारनवरे , मा. श्री. भास्करराव गोरे, सचिव, आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान, प्राचार्य शांतारामजी खनगे, प्राचार्य सुनील पानखेडे, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री विक्रमराव राजळे, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
या स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी मुले या गटात
प्रथम क्रमांक कु. सागर संदीप चितळे (न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर), द्वितीय क्रमांक कु. यश हरिभाऊ राजळे(न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर), तृतीय क्रमांक कु. सोहम गणेश माळी (न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर), इयत्ता ५ वी ते ७ वी मुली या गटात प्रथम क्रमांक कु. चैताली सतीश मरकड (न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर), द्वितीय क्रमांक कु. अदिती अमोल दगडखैर(श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, कासारपिंपळगाव), तृतीय क्रमांक कु. पुनम प्रकाश मरकड (न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर),
इयत्ता ८ वी ते १० वी मुले या गटात प्रथम क्रमांक कु. जय मनोज रांधवणे (शरदचंद्र पवार विद्यालय, तिसगाव), द्वितीय क्रमांक कु. आदित्य सतीश कर्डिले (श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, कासारपिंपळगाव), तृतीय क्रमांक कु. चैतन्य राजेंद्र बर्डे (श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, कासारपिंपळगाव), इयत्ता ८ वी ते १० वी मुली या गटात प्रथम क्रमांक कु. वैभवी दादासाहेब पवार (श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, कासारपिंपळगाव), द्वितीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी दत्तात्रय चव्हाण (शरदचंद्र पवार विद्यालय, तिसगाव), तृतीय क्रमांक कु. आरती आदिनाथ उघडे (श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, कासारपिंपळगाव),
११ वी ते महाविद्यालय मुले या गटात प्रथम क्रमांक कु. विठ्ठल आदिनाथ शिरसाठ ( दादापाटील राजळे कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, आदिनाथनगर) ११ वी ते महाविद्यालय मुली या गटात प्रथम क्रमांक कु. श्रद्धा विजय वाळके (लोकनेते आप्पासाहेब राजळे फार्मसी कॉलेज आदिनाथनगर) द्वितीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी संदीप रणमले ( दादापाटील राजळे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय क्रमांक कु. श्रुती सचिन थोरात ( दादापाटील राजळे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय) अशी विजेत्यांची नावे आहेत विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक रु. १०००/ व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास रु ७००/ व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकस रु ५००/ व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे वितरण करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरील स्पर्धेचे परीक्षण मा. श्री. सुधीरजी जोशी यांनी केले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मा. डॉ. विनायकराव हाडके यांच्या शुभहस्ते व मा. श्री. शिवाजीराव राजळे, अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती यांच्या अध्यक्षतेखाली पार संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री. शिवाजीराव कराड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी, मा. श्री. भास्करराव गोरे, मा. श्री. श्रीनिवास राजळे (विषय तज्ञ), मा. श्री. अनिल शिंदे (विषय तज्ञ), पत्रकार श्री. बाळासाहेब कोठुळे, मा. श्री. राजीव सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. मा. श्री.शिवाजीराव राजळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढील काळात चित्रकला क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. एस. तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले. डॉ. रोहित आदलिंग व प्रा. उमेश तिजोरे यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
8294
10




