हेल्थकेअर वर्कर प्रवर्गातील व्यक्तीसाठी विशेष प्राध्यान्याने लसीकरण व्हावे. - डाॕ. योगीराज देशमुख
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील हेल्थ वर्कर साठी खास वेगळा कोटा आरक्षित करून त्यांचे लसीकरण व्हावे, अशी मागणी पाथर्डी शहरातील संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ. योगीराज देशमुख व डॉ. सुरेश आव्हाड यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे व डॉक्टरांचे लसीकरण विशेष प्राधान्याने करण्याची गरज आहे. हेल्थकेअर वर्कर साठी लसीकरणाचा पहिला टप्पा होऊन गेला असला तरीही, अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे राहून गेले आहे. काहींना कोरोना होऊन गेल्याने महिनाभर लस घेता आली नाही. खाजगी क्षेत्रांमधील काही आरोग्य कर्मचारी हे हॉस्पिटल सोडून गेले आहेत, तर काही जण सरकारी नोकरी मध्ये रुजू झालेले आहेत. नवीन स्टाफ घेतल्याने त्यांचे लसीकरण झाले नाही. पंचायत समिती मध्ये कॉन्ट्रॅक्ट( करार) बेसवर काहींची भरती झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील नवीन घेतलेले खूप आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे राहिलेले आहे. त्यासाठी हेल्थ वर्कर ला खास वेगळा कोटा आरक्षित करून लवकरात लवकर सर्व हेल्थ वर्कर चे (आरोग्य कर्मचारी ) लसीकरण व्हावे, यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत.
दरम्यान डॉ. योगीराज देशमुख यांनी तहसीलदार शाम वाडकर यांच्याशी हेल्थ वर्करच्या लसीकरणाच्या बाबतीत भ्रमणध्वनीवरून सुसंवाद साधला आहे.