पाथर्डी तालुक्यातील 'या' ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
नगर सिटीझन live प्रतिनिधी - 17 मे 2021, सोमवार
पाथर्डी तालुक्यातील नगर - पाथर्डी रस्त्यावरील देवराई गावाजवळील हॉटेल सातबारा जवळ एका 70 वर्षे वयाच्या अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची माहिती करंजी पोलिस आउट पोस्टचे हवालदार काकासाहेब राख व ईश्वर बेरड यांना समजतात त्यांनी या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. या अज्ञात व्यक्तीच्या अंगामध्ये खाकी पॅंट, खाकी रंगाचा -शर्ट आहे. आढळून आलेल्या मृतदेहाबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा , असे आवाहन पोलिसांनी केले आहे.