आता शेवगाव तालुक्यातही 7 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर, अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकानही राहणार बंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शुक्रवार 07 मे 2021
शेवगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने तालुक्यात पुर्णपणे बंद करण्यात आले असून याचा माञ शेतक-यावर परीणाम होणार असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान होणार आहे.
शेवगाव शहर व तालुक्यात अनेक दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे.
यासाठी शेवगाव तालुक्यात मंगळवार दि. 11 मे ते सोमवार दि. 17 मे या कालावधीत सात दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेवगाव शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे. तरच कोरोना आटोक्यात येईल.
याबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी,
व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या काळात आरोग्यसेवा, पेट्रोल पंप, दूध संकलन सुरू राहणार असून किराणासह इतर व्यवसाय बंद असणार आहेत.
या जनता कर्फ्यूबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सुचना काढली असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
या कालावधीत दवाखाने व रुग्णालये, औषधांची दुकाने, सुरू राहतील मात्र इतर वस्तुंची विक्री करता येणार नाही.
पेट्रोल व डिझेल पंप (फक्त अत्यावश्यक सेवेसाठी), दूध संकलन सकाळी 7 ते 9 या कालावधीत सुरू राहील.
तर अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विकेते व इतर सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.