घरगुती सिलिंडरमधून गॕस काढून घेण्याचा काळाबाजार उघडकीस,तिंघाना अटक
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
ग्राहकांना घरपोहोच गॅस सिलिंडर टाकी देण्यापूर्वी त्यातील गॅसची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब नगरमध्ये उघडकीस आली आहे. टाक्यातून गॅसची चोरी करून व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस टाक्या भरत असलेल्या सावेडीच्या सिव्हील हाडको परिसरात तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या छाप्यामध्ये 43 गॅस टाक्या पकडण्यात आल्या आहेत. तीन जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी फिर्याद दिली आहे.
भगवानराम गिरीधरीराम बिष्णोई, (वय 23 जोधपुर राजस्थान), भजनलाल जगदीश बिष्णोई, (वय 21 रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. सावेडी परिसरातील सिव्हील हडको येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये काही इसम घरगुती गॅस टाकीमधून व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस टाकीमध्ये गॅस भरत आहे, अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला. या छाप्यात 43 गॅस टाक्या, वाहतूकीसाठी वापरणारी रिक्षा व इतर साहित्य असा 93 हजार 174 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.