महाराष्ट्र
2588
10
राजळे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
By Admin
राजळे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय अध्यापक संघटना (स्पुक्टो) यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
स्थानिक शाखेच्या वतीने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय अध्यापक संघटना (स्पुक्टो) स्थानिक शाखा दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथ नगर यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या (दि.20) पासूनच्या बेमुदत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अतुल चौरपगार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जनार्दन नेहुल, जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. सुभाष ज. देशमुख, खजिनदार प्रा. डॉ. निर्मला काकडे , प्रा. डॉ. राजू घोलप, प्रा. डॉ. महेबुब तांबोळी, प्रा. डॉ. राजकुमार घुले, प्रा. डॉ. ज्ञानदेव कांडेकर, प्रा. डॉ. विलास बनसोडे, प्रा. डॉ. साधना म्हस्के, प्रा. डॉ. गंगा लवांडे, प्रा. डॉ. जालिंदर कानडे, प्रा. अनिता पाटोळे, प्रा. मोहीनी कुटे, प्रा. देविदास गायकवाड, प्रा. डॉ. संजय भराटे, प्रा. रविंद्र बावस्कर, प्रा. डॉ. सुभाष देशमुख,विजय जेदे,दादा सोलाट,भाऊसाहेब म्हस्के आदि या उपस्थित होते.
बेमुदत काम बंद आंदोलन शिक्षकेत्तर कर्मचारी करत आहेत. शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी यांचे अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयात बेमुदत बंद आंदोलन होत आहे.
खर तर ही वेळ का आली? कशी आली हे कितीदा पोटतिडकीने शासनाच्या दरबारात केविलवान्यासारखं सांगावे . आत्मसन्मानांन जगणाऱ्या या सेवकांची गाऱ्हाणी एकूण घेण्यासाठी राज्यकर्त्यांनी फक्त फार्स केला आहे. मुजोर सचिवांनी चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करावे ही बाब म्हणजे आपण किती तत्पर मुलाहीजा ठेवून मंत्री विभागाचे पुढे -पुढे करणारे या सगळ्याचा तिटकाराच आहे. संघटनेचे शिलेदारांनी वेळोवेळी विनंती निवेदने, पत्रव्यवहार देऊनही आपल्या कथनाची कठपुथलीच
तरीही महासंघ, संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी खचला नाही खचू देणार नाही. रात्रंदिवस प्रवासात झोकुन दिलेले आपलेच बांधव झगडताट आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी, आपल्या हक्काची पेन्शन, आपल्या हक्काचे 12 व 24 वर्षांनी मिळणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेची, 7 व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून 10, 20, 30 सुधारित लाभाची योजना , 58 महिन्याची थकबाकी, कर्मचारी भरती व इतर अनेक मागण्या ज्या कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. दगडालाही पाझर फुटला असता इतक्या वेळा ही लढाई सुरू आहे. परंतु आपल्या पदरी सकारात्मक आश्वासनाची खैरात देऊन शासनाने फक्त निराशाच पदरी दिली आहे.
फार काही एवढ्या विस्तृत संख्येची वेतनवाढ होते का, सरकारी तिजोरीवर आपण जड होतोय का, बिलकुल नाही वेतनस्तर बदलल्याने 8 तास प्रामाणिक पणे राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोटावर मोजता येतील अशा वेतनाची वाढ अती होतेय का?
तर नाही मित्रांनो ही सर्व प्रश्ने आपल्याला मार्गी लावण्यासाठी या लढ्यात एकजुटीने सामोरे जायचे आहे.
शासनाच्या हाती आदेशाची दोर पतंग आहे ती फक्त हवेत , अन त्या मागे धावताना हतबल झालेली दशा आज होताना करताना दिसत आहे.
एकदा जी आर काढायचा अन पुन्हा काही कालावधीने, वर्षांनी काढून घ्यायचा, रिकव्हरी वसुली करायची हे अन्यायकारक आहे.
तोडा फोडा राज्य करा ही बाब लक्षात आली आहे. आता विद्यापीठ व महाविद्यालय ही सर्व एकजीव सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एक झाली आहे.
आता मागे वळायचे नाही आश्वासन घ्यायच्या माग नाही सर्वांच्या अभ्यासानुसार, विचारांची वज्रमुठ झाली आहे .
आता खूप आलेख झालेत धावाधाव करायचे आता पाहिजे तो फक्त लेखी आदेश
संयुक्त कृती समितीचे विद्यापीठ संघटना व
महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ यांचे हाकेला सर्वांनी एकत्र आंदोलन सुरू ठेवूया
शिक्षकेत्तर कर्मचारी एकजुटीचा विजय असो असे मत यावेळी शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केले.
Tags :

