महाराष्ट्र
13325
10
शेवगांव नगरपरिषद कार्यालय भरतय शेवगांव तालुका क्रीडा संकुलात
By Admin
शेवगांव नगरपरिषद कार्यालय भरतय शेवगांव तालुका क्रीडा संकुलात 30 जुन पर्यंत सोडावे लागणार कार्यालय विंचवाचे बिर्हाड पाठीवर
शेवगाव- प्रतिनिधी
माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी आमदार निधीतुन तालुक्यातुन दर्जेदार खेळाडु तयार व्हावेत म्हणुन त्यांच्या आमदार निधीतुन वीसवर्षांपुर्वी सुमारे कोटभर रुपये खर्च करून गेवराई रोडवर भव्य इनडोअर आणि मैदानी खेळांसाठी जिल्हा क्रीडा प्राधिकरनामार्फत तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या प्रशिक्षना बरोबरच निवासाची सुद्धा सोय करण्यात आली होती कालांतराने शेवगांव नागरपरिषद अस्तित्वात आली पण जुन्या मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातच कारभार सुरु राहिला दरम्यान च्या काळात विद्यमान आमदारांनी त्यांच्या निधीतुन किंवा नगरविकास खात्याकडून निधी आणुन नगरपरिषद शेवगांव साठी भव्य इमारत उभारणे अपेक्षित होतें पण आज नागरपरिषद अस्तित्वात येऊन आठ वर्षे झाली तरी कार्यालयाची स्वतःची हक्काची इमारत नाही उद्या नगरसेवक निवडुन आले सभागृह अस्तित्वात आले तर तर त्याना बसायला खुर्च्या सुद्धा नाहीत स्वतंत्र केबिन वगैरे सोडा याचा गंभीर विचार तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे नियोजित कार्यालय पाथर्डी नगर रोडवर नवीन तहसील कार्यालया शेजारी आणि गव्हर्नमेंट आय.टी.आय. च्या मागे आहे पण त्याला काही वर्षे लागु शकतात त्याआधी नगरपरिषदेला भाडे तत्वावर शहराच्या मध्यभागी जागा मिळणे गरजेचे आहे नगरपरिषदेचे अनेक स्व मालकीचे भूखंड आहेत पण ते काही अतिक्रमणात आहेत काही राजकारणी लोकांनी दाबले आहेत काहींवर अनेक बिल्डर आणि लॅन्ड माफियांचा डोळा आहे आता फक्त दोन महिन्यात नागरपरिषद प्रशासन कुठे आणि कसे आपले पाठीवरचे विचवाचे बिर्हाड हलवणार हा प्रश्न आहे
ताजा कलम
शेवगांव शहरात जिल्हापरिषद अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभाग महसुल चे जुने तहसील कार्यलाय च्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा आहेत पण जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय नगरविकास खात्याकडे त्या हस्तांतररित झाल्याशिवाय ताबा मिळणार नाही तालुका लोकप्रतिनिधींची अनास्था आणि प्रशासनाची हाराकिरी यामुळे शेवगावकरांना आपल्या समस्या घेऊन शहरापासून तीन किलोमीटर दूर आलेल्या क्रीडा संकुलात हेलपाटे मारावे लागतात याला जबाबदार कोण ???
शेवगांव नगरपरिषद चा बांधकाम परवाना विभाग म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय पालीकेकडून मंजूर नकाशा प्रमाणे कोणाचेही बांधकाम नाही ओपन प्लेस आणि पार्किंगला जागाच नाही सोडल्या लाखोंची बिदागी घेतली कोणी??? बांधकाम पुर्ण झालं
Tags :
13325
10





