महाराष्ट्र
27217
10
पाथर्डीत राजळे-ढाकणे गटातच सामना; अठरा जागांसाठी 37 उमेदवार
By Admin
पाथर्डीत राजळे-ढाकणे गटातच सामना; अठरा जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 118 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अठरा जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघातून आकाश वारे हे एकमेव उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राजळे गट व ढाकणे गट या निवडणुकीत आमने-सामने असणार आहे.
या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळ व प्रताप ढाकणे प्रणित जगदंबा महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरूवारी सहायक निबंधक कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राजळे प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे – सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गट – बाळसाहेब नागरगोजे, नानासाहेब गाडे, वैभव खलाटे, जगन्नाथ खेडकर, मधुकर देशमुख, सुभाष बर्डे, अजय रक्ताटे, महिला राखीव – स्मिता लाड, सुनिता कोलते. इतर मागास मतदारसंघ – अरूण रायकर. भटके विमुक्त मतदारसंघ – जिजाबा लोंढे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ – शेषराव कचरे, किरण राठोड, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – रवींद्र आरोळे. दुर्बल घटक – नारायण पालवे. व्यापारी आडते मतदारसंघ – प्रशांत मंडलेचा, कुंडलिक आव्हाड. हमाल मापाडी मतदारसंघ – अशोक सावंत.
ढाकणे प्रणित जगदंबा महविकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे – सोसायटी मतदारसंघ भाऊसाहेब गोरे, विठ्ठल बडे, नीलकंठ आव्हाड, अरविंद देशमुख, शिवनाथ हिंगे, रमेश लवांडे, कडूचंद शेटे. महिला राखीव – विनिता शिरसाठ, सुमन ढाळे. इतर मागास मतदारसंघ – मंगल म्हस्के. भटके विमुक्त – शशिकला सोलाट. सर्वसाधारण मतदारसंघ – आदिनाथ बडे, विलास टेमकर.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ- शोभा बर्डे. आर्थिक दुर्बल घटक – सुभाष लाड. व्यापारी मतदारसंघ – अजितकुमार मेहेर, कैलास गिते. हमाल मापाडी – बाबासाहेब केदार. उमेदवार निश्चित झाल्याने आता प्रचाराचा शेवटचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. 28 एप्रील रोजी मतदान होऊन 29 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामध्ये कोण बाजी मारतो, याकउे तालुक्याचे लक्ष लागून आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील खर्डे, सहायक म्हणून योगेश नरसिंगपूरकर हे काम पाहत आहेत.
विद्यमान अठरापैकी एकाच संचालकास उमेदवारी
सत्ताधार्यांकडून पंधरा जुन्या संचालकांना डच्चू
राजळे गटाकडूनही दोन संचालक रिंगणाबाहेर
Tags :
27217
10





