महाराष्ट्र
10780
10
बांधकामावरील प्लेटा चोरणारी टोळी जेरबंद
By Admin
बांधकामावरील प्लेटा चोरणारी टोळी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बांधकामावरील लोखंडी प्लेटा चोरणार्या तीन जणांच्या टोळीला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघा संशयितांपैकी दोघे अल्पवयीन, तर एक वैभव राजेंद्र बोरूडे (वय 26, रा.
एडके कॉलनी चिंचपूररोड, पाथर्डी) या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून आनखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही टोळी फ्लेक्स बोर्ड चिटकविण्याचे काम रात्री कारायची एखाद्या बांधकाम सुरू असल्याच्या ठिकाणाची पाहणी करून चोरी करायचे. या टोळीने तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील डमाळवाडी येथे नळ पाणी योजनेचे पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. या कामाच्या ठिकाणी असलेल्या लोखंडी सेंट्रींगच्या अठरा प्लेटा, गोल फार्म लोखंडी आठ प्लेटा, 35 सिमेंटच्या गोण्या, असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल सोमवारी (दि. 13) रात्री चोरुन नेला होता.
याबाबत जय माता दी स्टोन क्रशर अॅण्ड कन्ट्रक्शन सुपरवायझर अशोक दहिफळे यांनी पाथर्डी पोलिसात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ही चोरी वैभव बोरूडे व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. न्यायालयाने वैभवला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन लिमकर, पोलिस कर्मचारी भगवान सानप, नीलेश म्हस्के, संदीप कानडे, देविदास तांदळे, अतुल शेळके, संदीप बडे यांच्या पथकाने 24 तासांच्या आत शोध लावून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जय माता दी ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान दराडे, भाऊसाहेब धस, दत्ता दराडे, कैलास दराडे, फुलचंद चेमटे, आदर्श काकडे, सुखदेव मर्दानी, हनुमान बडे आदी उपस्थित होते.
Tags :
10780
10





