अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला धक्का या जेष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नगर सिटीझन live team-
भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका, अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अहमनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांचे समर्थक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, घटना घडत असतात. कोण जात असतं येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पद पवारसाहेबांनी दिले.
पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली आहेत.
आमचे सहकाराशी आपलेपणाचे नाते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लहानपणातच सहकाराची जबाबदारी आली होती
पवारसाहेबांनी वसंतदादा यांच्यानंतर सहकाराला आधार दिला असं त्यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील पिचड समर्थक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.