पाथर्डी- प्रतिनीधी
खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्यातर्फे आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते तसेच पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अभय काका आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी साखर आणि दाळ वाटप समारंभ तसेच शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा फुलेनगर, खुले नाट्यगृह, कसबा-खोलेश्वर मंदिर, हंडाळवाडी येथे संपन्न झाला. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.