महाराष्ट्र
8232
10
नव्याने 34 महसूल मंडळ, 202 तलाठी सजांची भर
By Admin
नव्याने 34 महसूल मंडळ, 202 तलाठी सजांची भर
पदोन्नती मिळालेल्या बहुतांश मंडलाधिकार्यांना नव्याने निर्माण झालेल्या मंडळ कार्यालयांत नियुक्ती मिळाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य शासनाने जिल्ह्यासाठी नव्याने 202 तलाठी सजा आणि 34 महसूल मंडळ कार्यालये मंजूर झाली आहेत. त्यामुळे तलाठी सजाची संख्या आता 788 तर मंडळ कार्यालयांची संख्या 131 झाली.
कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे तलाठी संवर्ग पदाच्या संख्येत 202 तर महसूल मंडलाधिकारी संवर्गाच्या 34 पदांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे शुक्रवारी 51 तलाठ्यांना मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे.
तलाठी संवर्गाची पदे थेट सरळसेवा भरतीने भरावयाची आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमाबंदी विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. जिल्ह्यात तलाठी सजा आणि मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे महसुली कामकाजाला वेग येणार आहे. राज्य शासनाने 2017 -18 मध्ये तलाठी सजांची पुनर्रचना केली. त्यानुसार राज्यात 3 हजार 165 नवीन सजा निर्माण करण्यात आले.
6 तलाठी सजांमागे एक महसूल मंडळ यानुसार नवीन 528 महसूल मंडळे निर्माण करण्यात आले. नगर जिल्ह्यासाठी किती तलाठी सजा आणि महसूल मंडळ कार्यालयांची आवश्यकता आहे. याचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे मागविला होता. त्यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यासाठी वाढीव 202 तलाठी सजा आणि 34 महसूल मंडळ कार्यालये मंजूर केले आहेत.
नगर तालुक्यात 15 सजा आणि 1 महसूल मंडळ, अकोले तालुक्यात 21 सजा व 4 मंडल कार्यालयांची वाढ झाली. तालुकानिहाय कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 23 सजांची तर कमीत कमी 1 तर जास्तीत जास्त 4 महसूल मंडळाची वाढ झालेली आहे. तलाठी व महसूल मंडळ कार्यालयांची संख्या वाढल्याने तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडील कामांचा बोजा कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे.
तलाठी पदांची एकूण संख्या कंसात वाढ
अकोले 69 (21), संगमनेर 83 (22), कोपरगाव 38 (7), राहाता 37 (8), श्रीरामपूर 31 (6), राहुरी 50 (8), नगर 72 (15), नेवासा 63 (15), पाथर्डी 56 (17), शेवगाव 47 (9), श्रीगोंदा 68 (20), पारनेर 73 (23), कर्जत 59 (23), जामखेड 39 (8).
मंडलाधिकारी एकूण संख्या कंसात वाढ
अकोले 12 (4), संगमनेर 14 (4), कोपरगाव 6 (1), राहाता 6 (1), श्रीरामपूर 5 (1), राहुरी 8 (1), नगर 12 (1), नेवासा 11 (3), पाथर्डी 9 (3), शेवगाव 8(2), श्रीगोंदा 11 (3), पारनेर 12 (4), कर्जत 10 (4), जामखेड 7 (2).
पदोन्नती मिळालेल्या बहुतांश मंडलाधिकार्यांना नव्याने निर्माण झालेल्या मंडळ कार्यालयांत नियुक्ती मिळालेली आहे. डी. एस. करपे- आढळगाव, बी.सी. शेख -खरवंडी कासार, ए. एम. इंगळे -गोदाम व्यवस्थापक कर्जत, बी.एम. कुसमुडे -प्रवरासंगम, श्रीमती एस.डी. वाकचौरे- वाकी, आर.के. झेंडे- अस्तगाव, डी.आर. म्हेत्रे-लोणी व्यंकनाथ, एस.आर. खंडागळे – देडगाव, ए. आर. आव्हाड -निमोण, डी.बी. हाडोळे -रुंभोडी, बी.जे. कर्डिले-खेड, बी.एफ. कोळगे-गोदाम व्यवस्थापक राहाता, व्ही.व्ही. भडके -गोदाम व्यवस्थापक शेवगाव, एस.एस. जेठे- पळवे खुर्द, ए. एम. चौगुले-गोदाम व्यवस्थापक अकोले, श्रीमती के.व्ही. श्रीमंदिलकर- अकोला, श्रीमती एम.आर. ढगे-लिंगदेव, श्रीमती व्ही.डी. सातपुते-नांदूरखंदरमाळ, श्रीमती एस.बी. विधाते -कान्हूर पठार, श्रीमती व्ही.व्ही.कोल्हे- कोकमठाण, डी.एन. केसकर-कुळधरण, श्रीमती बी.बी. शिंदे- कारेगाव, पी.ए. कटारनवरे तिसगाव, व्ही.बी.खेडकर- चापडगाव, श्रीमती एस.एस.मरकड-बारागाव नांदूर, श्रीमती एम.बी. सांगळे- घुलेवाडी, एस.ए. देखणे-गोदाम व्यवस्थापक नेवासा, एन.आर. जावळे- सुरेगाव, श्रीमती व्ही.पी.कदम – करमणूक कर निरीक्षक कर्जत, श्रीमती एम.आर. डोंगरे- तळेगाव, ए.पी. रोडगे- कोरेगाव, श्रीमती ए.आर. साठे – संगमनेर खुर्द, ए.डी.गव्हाणे -नेवासा खुर्द,
एस.एम. तनपुरे-वालवड, आर.एस. जोशी-पाटोदा, श्रीमती एस.एल.दहिफळे-दहिगाव ने, जे.एस. मापारी – जवळा, ए.बी. डोळस- पळशी, डी.आर. बांबळे -शेंडी, एस.एम. कटारे- पुरवठा निरीक्षक राहाता, एस.आर. नाचन- भानगाव, श्रीमती एस.व्ही.मुंडे-भानसहिवरे, बी.जी.पवार- अळकुटी, यु. आय. मुतगेकर -अव्वल कारकून कर्जत, श्रीमती एन.जी. नाईक-अव्वल कारकून श्रीरामपूर, एम.एम.पठाण- अव्वल कारकून कर्जत, ए.एस. कुंदेकर- श्रीगोंदा, एस.पी. गौंडा- मुंगी, ए.एल. सिरसट- साकत, ए.एस. आंबरे- खिरवरे, व्ही.पी. राठोड -राशीन.
चौदा महिला तलाठी झाल्या मंडलाधिकारी
प्रशासनाची निकड, कर्मचार्यांची सोय आणि नागरी सेवा मंडळाकडील शिफारशी विचारात घेऊन तलाठी संवर्गातील 51 कर्मचार्यांना शुक्रवारी महसूल मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये 14 महिलांचा समावेश आहे.
Tags :
8232
10





