महाराष्ट्र
11078
10
महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनची एच यु आय डी विषयी झाली बैठक
By Admin
महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनची एच यु आय डी विषयी झाली बैठक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनची पुणे येथे झाली एच यु आय डी विषयी झाली बैठक
काल दिनांक 30/03/2023 रोजी UGJIS यांचे व पुणे सराफ असोसिएशन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशने महाराष्ट्रातील सराफ सुवर्णकार बंधुना HUID व प्रिव्हेंशन आॅफ मनिलाॅंड्रीग अॅक्ट ( PMLA) हा केंद्र सरकारने आपल्या व्यवसायावर पुर्णपणे लागु केला असुन त्या बाबत आपल्या फेडरेशन चे अध्यक्ष आदरणीय फत्तेचंदजी रांका साहेब यांनी विस्तृत पणे कायदयाची व्याख्या व त्याचे फायदे व नुकसानी संदर्भात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुवर्णकार व सराफ बंधुना सखोल मार्गदर्शन करून अमूल्य अशी माहिती दिलेली आहे, ती खालील प्रमाणे-
1. हाॅलमार्कींग कायद्याचे अनुषंगाने BSI ने संपूर्ण देशात HUID म्हणजेच 6 आकडी नंबर असणारे दागिने विक्री करणे सक्तीचे केलेले असुन दिनांक 1.04.2023 पासुन सदर कायद्या प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिलेले आहेत.
2.ज्या व्यापारी बंधुची वार्षिक उलाढाल 40 लाखाचे वर आहे व ज्यांचेकडे होलमार्किंग चे लायसेन्स आहे त्या सर्वांना आपापल्या दुकानात हाॅलमार्कींग HUID केलेले दागिने ठेवने बंधनकारक आहे.
3. 2 ग्रामवजनाचे आतील दागिन्यांना HUID मधुन पुर्णपणे वगळलेले आहे.
म्हणजेच 2 ग्राम सिंगल दागिना व जोडी मधील एक दागिना 2 ग्राम चे आतील असा समजावा.
4.लाखेचे मनी, बोरमाळ, लिंबोळी माळ यातील मनी बिलावर नग म्हणून नोंदणी झाली पाहिजे व त्या वस्तुंना HUID मधुन वगळण्यात आले आहे.
5.जी गावे हाॅलमार्कींग सेंटर अभावी सदर कायद्यातुन तात्पुरती वगळण्यात आली आहेत परंतु तेथील काही व्यापारी बंधुनी हाॅलमार्कींग चे लायसेन्स घेतले आहे त्यांना HUID बंधनकारक आहे.
6.एखादा मोठा दागिना HUID केल्यानंतर त्यात काही फेरबदल करायचा असेल तर त्याची बिलावर स्पष्टपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ. एखादि 25.00 ग्राम वजनाची चैन 30 इंच असेल व ती कमी करुन म्हणजेच 18 इंच करायची असेल व तिचा 7.00 ग्राम तुकडा उरला असेल या सर्व बाबी बिलावर नमुद करणे अत्यावश्यक आहे.
7.या कायद्याच्या अनुषंगाने संपुर्ण कायदे उदा. 411,412,
भारतीय दंड संहिता
भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा
नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्राफिक पदार्थ कायदा
पुरातन वास्तू आणि कला खजिना कायदा
ट्रेडमार्क कायदा
वन्यजीव संरक्षण कायदा
काॅपीराईट कायदा
माहिती व तंत्रज्ञान कायदा इत्यादी.
कायदे सदर कायद्याच्या चौकटीत बसवून तो प्रभावीपणे राबविण्याची केंद्र सरकारची मनस्थिती आहे.
8.सदर संपूर्ण कायद्याचे उल्लंघना साठी 3 ते 7 वर्ष सश्रम कारावास, दंड, व माल जप्ती सारख्या गंभीर शिक्षेचे प्रयोजन करण्यात आले आहे.
9.अतिश्य घातक कायद्या सरकारने केला असुन जाचक अटिंना महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन व पुणे सराफ असोसिएशने पुर्ण विरोध केला असुन त्या सदर कायद्यातील जाचक अटिंना विरोध करणाऱ्या देशातील पहिल्याच संघटना आहेत.
10.पुणे सराफ असोसिएशने मेहेरबान मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली असुन सदर याचिकेची सुनावणी अंदाजे जुन महिन्या दरम्यान होईल तुर्तास न्यायालयाकडून कोणताहि दिलासा मिळाला नाही.
11.आपले अध्यक्ष आदरणीय फत्तेचंदजी रांका साहेब यांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनात अतिश्य तळमळीने राज्यातील प्रत्येक व्यापारी बंधुनी सचोटीने, प्रामाणिकपणे, जिद्दीने, एकमेकांच्या संघटनात्मक विचारांनी पारदर्शक पणे व्यापार करून एकमेकांच्या पायात पाय न घालता कार्पोरेट क्षेत्राशी जोरदारपणे व्यावसायिक स्पर्धा करून टक्कर द्यावी असे आवाहन केलेले आहे.
सदर महत्वाचे सभेसाठी श्री. सुधाकर अन्ना टाक, श्री. नितीन जी अष्टेकर, श्री शिरीष जी खखटेकर, श्री. अमृत काका सोळंकी,श्री.दत्ताशेट देवकर, श्री.गणेशशेट बेंद्रे, श्री. गौतमशेट सोळंकी, फेडरेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
11078
10





