शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी शिवसेना उबाठा तीव्र आंदोलन करणार!
पाथर्डी प्रतिनिधी:
मागील वर्षाचा पीक विमा पाथर्डी तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना मिळावा अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा पाथर्डी तालुका शिवसेनेच्या ( उबाठा )पक्षाचे वतीने दिला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामातील पिकांचे आणि फळबागाचे विमा उतरवीला होता. मात्र गेल्या हंगामात भयानक दुष्काळ पडल्यामुळे शेतऱ्याचे पीक वाया गेले तर फळबागा पाण्या अभावी निकामी झाल्या. काही शेतकऱ्यांनी टँकर ने पाणी आणून फळबागा वाचवल्या आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई मिळणे अपेक्षित असताना अद्यापही ती मिळालेली नाही.मागील वर्षीचा पीक विमा नाही आणि चालू वर्षाचा खरीप हंगामाचं खर्च यामुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, येत्या ७ ऑगस्ट पर्यंत विमा न मिळाल्यास तहसील कार्यलया समोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार, सेनेचे जेष्ठ नेते घुमटवाडीचे सरपंच नवनाथ चव्हाण, निवडूंगेचे माजी सरपंच आसाराम ससे, नवनाथ उगालमुगले, अंबादास आरोळे, नवनाथ वाघ, नंदकुमार डाळिंबकर, सतीश वारुंगळे आणि आकाश म्हस्के यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती खासदार निलेश लंके, तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.