महाराष्ट्र
1052
10
विद्यार्थ्यांचा हरिभक्त परायण नारायण बाबा
By Admin
एन एम एम एस परीक्षेत पात्र झालेल्या 9 विद्यार्थ्यांचा हरिभक्त परायण नारायण बाबा झिंजुर्के प्रतिष्ठान तर्फे सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे बुद्रुक दिनांक 17 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे येथील इयत्ता आठवीच्या वर्गातील 11 पटा पैकी 9 विद्यार्थी रोहित नलवडे,प्राची दोडे,प्रफुल्ल शेलार, बळिराम नलावडे, वैभव मगर, काजल थोरात, संदीप डाके. दता डाके, समाधान डाके राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये पात्र ठरल्याने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोलजी नलवडे यांनी भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प श्रीराम झिंजुर्के महाराज होते. महाराजांनी यावेळी पालकांना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना एखादे शिक्षक आपल्या पाल्यास रागावले असतील तर ते चांगले संस्कार करण्यासाठी आहेत असा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी पाथर्डी- शेवगाव च्या कर्तव्यदक्ष *कार्यसम्राट आमदार लोकनेत्या आदरणीय मोनिकाताई राजीव राजळे यांच्या हस्ते 9 विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या आणि 2020 चे शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मयूर खटावकर या विद्यार्थ्यांचा देखील ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच 2021 मध्ये एन. एम. एम. एस या परीक्षेत परीक्षेत 48 हजार शिष्यवृत्ती मिळवणारी कु.सारिका थोरात हिचाही सन्मान करण्यात आला.
यावेळीशाळेतिल पवार सर.मोरे सर.साळवे सर.देशमुख सर।अंबेटकर .बडे सर.चव्हाण सर.धायतडक सर.यांच्या सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक दुर्योधन नलवडे गुरुजी यांनी केले. तसेच कार्यक्रमास माननीय राहुल दादा राजळे माजी जिल्हा परिषद सदस्य, माननीय विष्णुपंत अकोलकर माजी उपसभापती, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी आमदार महोदय शैक्षणिक कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला व तालुक्यात तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वर्गवार सामान्य ज्ञान स्पर्धा दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्याची योजना जाहीर केली.
त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी श्री अनिल भवार साहेब यांनीही पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजेंद्र बागडे उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये आदरणीय आमदार मोनिकाताई यांनी अत्यंत गरीब विद्यार्थिनी काजल थोरात हिने केलेल्या भाषणानंतर आपण तिला दत्तक घेण्यासाठी व तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासाठी ग्रामस्थांबरोबर चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच श्री अमोल नलवडे,श्री शिवनाथ उनबेग यांनी आभार मानले.
Tags :

