महाराष्ट्र
91071
10
स्वयंरोजगार निर्मितीचे धडे मशरूम शेती कार्यशाळेतून मिळतील- प्राचार्य डॉ. पवार
By Admin
स्वयंरोजगार निर्मितीचे धडे मशरूम शेती कार्यशाळेतून मिळतील- प्राचार्य डॉ. पवार
पाथर्डी प्रतिनिधी-
श्री. तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री. आनंद कॉलेज, पाथर्डी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मशरूम लागवड व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. शेषराव पवार, डॉ. जनार्धन नेहुल, प्रा. अमोल बुधवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते.
कार्यशाळेचे उद्घाटन परमपूज्य राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज साहब यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. कार्यशाळेचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जगन्नाथ बरशिले यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ. पवार यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन अपारंपारिक शेती व्यवसायाचे महत्त्व विशद केले. मशरूम शेतीच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार कसा निर्माण करू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. अशा कार्यशाळेमधून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी निश्चित मदत होईल, अशी आशा व्यक्त केली.
मशरूम शेती व प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत व्याख्यानाचे व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या व्याख्यानाचे पुष्प गुंफण्यासाठी डॉ. जनार्धन नेहुल यांनी मशरूम लागवड व मशरूमचे आहारातील महत्व या विषयावर बोलतांना आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनांचे महत्त्व विशद केले. मशरूमचा आहारात नियमित वापर केल्यास आपले आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होईल. दैनंदिन आहारात मशरूमचे फायदे याबाबत सखोल माहिती दिली. प्रा. अमोल बुधवंत यांनी मशरूम लागवड याविषयी सखोल माहिती दिली.डॉ. धीरज भावसार, प्रा. वैष्णवी बडे यांनी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.
कार्यशाळेसाठी प्रा. अनिता पावशे, डॉ.पगारे, डॉ. अजिंक्य बोर्डे, प्रा. सूर्यकांत काळोखे उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्याच्या दृष्टीने संस्थेचे सचिव सतिश गुगळे व महाविद्यालयाचे विभागप्रमुख सुरेशशेठ कुचेरिया यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वी होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचारी व प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भडके व वैष्णवी वीर यांनी केले. डॉ. धीरज भावसार यांनी आभार मानले.
Tags :
91071
10





