महाराष्ट्र
5080
10
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार, शिंदे सरकारकडून मोठी घोषणा
By Admin
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जाचं टेन्शन दूर होणार, शिंदे सरकारकडून मोठी घोषणा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळेच भारतातून कृषी उत्पादन निर्यात केले जाते. येथील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर (Agriculture Business) अवलंबून आहे.
नुकताच भारताचा दुग्ध उत्पादनात देखील प्रथम क्रमांक लागला आहे. शेतकऱ्यांनी अशी शेती (Department of Agriculture) करत प्रगत होत जावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा मिळेल, हा उद्देश आहे. आता शेती करण्यास कर्ज (Bank Loan) घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार
राज्य सरकारकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Agricultural Information) महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणे आवश्यक आहे.
कोट्यवधींच्या निधीची घोषणा
आता नियमीतपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल 1 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे. केवळ 5 महिन्यात 4 हजार 700 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. ज्यातून शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
ऑनलाईन पोर्टल विकसित
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान (Subsidy) लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य शासनाने थेट ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. हे ऑनलाइन पोर्टल 'महाआयटी'द्वारे विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना (Type of Agriculture) महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनामोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या पाच महिन्यात ४ हजार ७०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
शिंदे सरकारने 29 जुलै रोजी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा निर्णय घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी कर्जमुक्ती योजनेसाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची घोषणा केली होती. 16 सप्टेंबर रोजी 2 हजार 350 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला
18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी मंजूर करण्यात आला. तर 17 जानेवारीला तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटी मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी शिंदे सरकारकडून शिल्लक एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Tags :

