महाराष्ट्र
2786
10
कवडदरा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
By Admin
कवडदरा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम (दि.25) शनिवार रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी
दहावीतील विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला.तसेच शाळेला भेटवस्तू दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही.एम.कांबळे होते.
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात तसेच पेपर सोडवताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे व आत्मविश्वास, अचूकता,तत्परता या तीन गुणांचे परीक्षेच्या वेळी असलेले महत्त्व अगदी सुस्पष्ट भाषेत नमूद केले. यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे दडपण न ठेवता परीक्षा द्यावी.तसेच विषयाचा अभ्यास करताना मन एकाग्र करत अभ्यास करावा.
परीक्षेला जाताना वेळेवर परीक्षा केंद्रावर जावे.तसेच पेपरच्या मनामाध्ये कोणतीही भिती ठेवू नये.परीक्षा केंद्रावरील नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.प्रश्न प्रञिकेतील प्रश्न काळजीपूर्वक विचार करुन सोडवावेत.विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेसंबधी मार्गदर्शन
माहीती प्राचार्य व्ही.एम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तसेच विद्यालयाला निरोप देताना विद्यार्थी भारावून गेले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षे संबधी मार्गदर्शन करत परीक्षेला शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Tags :

