गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार की नाही? समोर आली महत्वाची माहिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य सरकारने २२ मार्चला गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती.
सरकारने हा आनंदाचा शिधा रेशन दुकानातून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागरिकांना हा शिधा मिळाला नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा केव्हा मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, आनंदाचा शिधा केव्हा मिळणार, याबाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
२२ मार्चला गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र सरकारने घोषणा केली. त्या प्रमाणे रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. मात्र तो अद्याप दुकानात आलेला नाही.
या शिधा मध्ये एक किलो साखर,एक किलो चना डाळ,एक किलो तेल आणि एक किलो रवा देण्याची घोषणा केली होती याविषयी माहिती घेतली असता तो शासकीय गोदामातच आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोदामातच नसताना, दुकानात कसा येणार आणि वेळेत वाटप कसे होणार ? हा प्रश्न आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सहा लाख 84 हजार तीनशे एक इतके लाभार्थी असून अहमदनगर जिल्ह्यात अद्याप संपूर्ण शिधा मिळाला नसून चार वस्तू आल्या नंतर मार्च अखेर पर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.
दिवाळी सणामध्ये आनंदाचा शिधा वाटप करताना आलेल्या अडचणी पाहून आता पुरवठा विभागाने तालुकावार नियोजन केले आहे. शिधा वाटपास कर्मचारी संपाचा अडथळा होता. मात्र आता संप मिटल्याने तो दूर झाला आहे. पण सर्व गोदामात आनंदाचा शिधा उपलब्ध होईल, त्याच दिवशी अधिकाधिक दुकानापर्यंत शिधा पोहचविण्याचा प्रयत्न आहे, अशीही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.